BANNER

The Janshakti News

भिलवडी येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न... ३५० नागरिकांनी घेतला लाभ..

भिलवडी येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न...
३५० नागरिकांनी घेतला लाभ..








भिलवडी | दि.१५/०९/२०२१

आष्टा क्रिटिकेअर हॉस्पिटल व भिलवडी ग्रामपंचायत भिलवडी यांच्या सयुक्त विद्यमाने भिलवडी येथील  श्री हनुमान मंदिर  येथे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व तपासणी, औषधे, डायबीटीस (रक्तातील साखर) तपासणी, रक्तदाब तपासणी, इ.सी.जी. अश्या सुविधा भिलवडीमधील जनतेला  मोफत उपलब्ध व्हाव्यात या हेतूने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सुमारे ३५० रुग्णांच्या विविध तपासण्या निःशुल्क करण्यात आल्या.
हे शिबिर आयोजित करताना 


 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच,सद्स्य , श्री.प्रविण नलवडे ,  डॉ. सुनील वाळवेकर व डॉक्टर्स असोसिएशनचे सहकार्य मिळाले. 


 यावेळी आष्टा क्रिटिकेअर हॉस्पिटलचे तज्ञ डॉ.संतोष व्हटकर, डॉ.ऐश्वर्या जाधव, श्री. प्रशांत शेलार , व सहकारी श्री. पवन मस्के-पाटील, श्री. सनी मोरे, श्री.सतीश धनवडे, श्री. रोहित शेळके व कु.मनस्वी यादव उपस्थित होते.
हेच शिबिर उद्या 16 /09 / 2021 रोजी माळवाडी ग्रामपंचायत , आजी माजी सैनिक संघटना भिलवडी व क्रिटीकेअर हॉस्पिटल आष्टा यांच्या संयुक्त विद्यमाने माळवाडी येथे होत आहे. तरी माळवाडी व परिसरातील नागरिकांनी  या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ. ऐश्वर्या जाधव यांनी केले आहे..