BANNER

The Janshakti News

भिलवडी येथे कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर.. पलूस न्यायालयाच्या वतीने करण्यात आले मार्गदर्शन...
भिलवडी | दि.17/09/2021

 मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार,
पलूस न्यायालयाच्या वतीने पलूस तालुक्यातील भिलवडी व सुखवाडी येथे ऑनलाइन कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.हे मार्गदर्शन शिबिर भिलवडी ग्रामपंचायत कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले.यामध्ये पलूस न्यायालयाचे मा. न्यायाधीश, वकील संघटनेचे अध्यक्ष व नामवंत वकीलांनी भाग घेवून, ग्रामस्थांना कायदे विषयक योग्य ते मार्गदर्शन केलेयावेळी भिलवडी गावच्या सरपंच सविता (महिंद) पाटील, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे, तलाठी गौसमहंमद लांडगे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या मार्गदर्शन शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी बहुउपयोगी कायदेशीर माहिती मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले.