BANNER

The Janshakti News

जागतिक चालक दिनानिमित्त चालकांचा सत्कार..

मिरज | दि. 17/09/2021

जागतिक चालक दिनानिमित्त इंडियन ऑइल डेपो मिरज येथे आज दि.17/09/2021 रोजी ड्रायव्हर बांधवांचा सत्कार व मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी चालक-मालक यांच्या हक्कासाठी गेले पंधरा वर्ष लढणारे व त्यांच्या आड अडचणीच्या वेळी मदतीला धावून येणारे समाज सेवक ज्येष्ठ पत्रकार मा. इरफानभाई बारगीर  यांच्या हस्ते सर्व चालक बांधवांचा सत्कार करण्यात आला.  


इंडियन ऑइल डेपो चे अध्यक्ष अंकुश गडदे यांनी ड्रायव्हरांना मार्गदर्शन केले.चाबुकस्वार मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे मालक मा. आमीन चाबुकस्वार हे देखील या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते. त्यांनी ही सर्व ड्रायव्हर बांधवांना चालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.तात्यासाहेब घाटगे , मा. कबीर मुजावर , मा. सागर घाडगे , मा. अरुण देवर्षी , मा. सुधाकर माळी , मा.सुभाष एडके , मा. सचदेव कांबळे ,मा.बाबू चिवटे व चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.