BANNER

The Janshakti News

जवान किसान सन्मान दिनी धनगांवातील विविध मान्यवरांचा गौरव..जवान किसान सन्मान दिनी धनगांवातील विविध मान्यवरांचा गौरव..

भिलवडी | दि. 18/09/2021

धनगांव ता. पलुस येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस जवान किसान सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. सांगली जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिह देशमुख य‍ंच्या हस्ते महापूर आणि कोरोना काळात विशेष कामगिरी करणार्‍या शासकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते,माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.


सर्वसाम‍ान्य माणसाला, शेतकर्‍यांना सन्मानाने जगण्याचे बळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे,पूरग्रस्त कृष्णाकाठाला मदतीची आपेक्षा आहे.सरकार मदत करुन उपकार करत नाही,त्यांच्या हक्काचे आहे ते दिले पाहिजे. न भरुन येणारे नुकसान झालय 2019 च्या निकषाप्रमाणे मदत करावी आणि महापुरातुन सावरणार्‍या कृष्णाकाठच्या जनतेला आधार द्यावा असे प्रतिपादन संग्रामसिंह देशमुख यांनी केले.


धनगांव गांवात सलग दोन वर्षे महापुरात आणि कोरोना काळात अविरथ सेव‍ा बजावून ग्रामस्थांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत केल्याबद्दल ग्रामसेवक प्रकाश माळी तलाठी सौ पुजा सुर्यवंशी, मह‍वितरणचे कर्मचारी सोहेल मुजावर,
प्रणिल सावंत, आरविंद जाधव


अ‍ाशा स्वयंसेविका सौ. सविता यादव, सौ. सुरेखा सावंत,अंगणवाडी सेविका सौ.मंगल बन्ने, श्रीमती संगिता रोकडे यांच्यासह मदतनीस लता कुर्लेकर,सौ. माया साळुंखे, सौ शोभा पवार, सौ. वंदना साळुंखे य‍ांच्य‍ासह डॉ. रामचंद्र मोहिते, डॉ. वृषभ पाटील, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष विजय साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला.


प्रास्ताविक दिपक भोसले यांनी,
स्वागत दत्ता उतळे यांनी केले तर गणेश फिरमे यांनी आभार मानले.
यावेळी हनुमान सोसायटीचे चेअरमन सुरेश साळुंखे, व्हा.चेअरमन सौ. निर्मला मोहिते,भाजपचे तालुका अध्यक्ष विजय पाटील,माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष जी. के. शेख, युवा मोर्चा अध्यक्ष रोहित पाटील,


बुरुंगवाडीचे नेते शिवाजी तावदर, मधुकर खोत,रायशिंग हिरुगडे,रविंद्र साळुंखे, प्रदिप साळुंखे,शैलेश साळुंखे, अमोल साळुंखे, संजय मोहिते, निलेश जौंजाळे, शैलेश सावंत, मनोज साळुंखे धनगांव भाजपचे अध्यक्ष रणजीत साळुंखे, संग्राम पाटील, अमित साळुंखे, पांडुरंग जाधव, सुनिल भोसले, संभाजी भोसले आदींसह मान्यवर उपस्थित होते.