BANNER

The Janshakti News

16 वी जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धा संपन्न...

     16 वी जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धा संपन्न...

कल्हापूर | दि. 6/9/2021

     16 वी जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धा चिंचवाड  ता.करवीर  येथे वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट यांचे वतीने आणि एबीपी स्पोर्टस यांचे सहकार्याने  दि . 4 ते 6 सप्टेंबर 2021 रोजी चिंचवाड हायस्कुल चिंचवाड , ता . करवीर , जि- कोल्हापूर येथे घेण्यात आली.या
स्पर्धेचे उद्घाटन चिंचवाड हायस्कूल चिंचवाड चे मुख्याध्यापक श्रेणिक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते.


या स्पर्धेत 150 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या  स्पर्धा सान्सू ( फाईट ) व तावलू प्रकारात वजनी गटात घेण्यात आल्या. सदरच्या या स्पर्धा covid-19 च्या अनुषंगाने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन घेण्यात आल्या होत्या.या स्पर्धेतील विजयी खेळाडूंची निवड 19 व्या राज्यस्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. 
 प्रथम क्रमांकाचा चॅम्पियनशिप चषक  एबीपी स्पोर्ट्स आजरा तालुका, द्वितीय क्रमांक करवीर तालुका, तृतीय क्रमांक शिरोळ तालुका यांनी पटकावला या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळा  प्रमुख पाहुणे चंद्रकांत पाटील (गांधीनगर मोटार ग्रुप ट्रांसपोर्ट अध्यक्ष) बाळासाहेब मुधाळे हुपरी नगरसेवक शोतोकान कराटे डो अध्यक्ष रमेश पिसाळ, गणेश पाटील, संयोजक सुभाष पाषाणा, अविनाश पाटील,पत्रकार हुमायुन नदाफ  यांच्या हस्ते संपन्न झाला. 
यावेळी तालुका प्रतिनिधी विजय वायदंडे प्रवीण कुचगावे पवन टिपुगडे संभाजी खोत हे उपस्थित होते. स्पर्धा प्रमुख व पंच म्हणून शहानवाज नदाफ आणि टीम यांनी काम पाहिले.
 तर यावेळी    पत्रकार हुमायून नदाफ यांना  वुशू असोशियन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट यांचे वतीने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
हुमायुन नदाफ यांनी निर्भीड ,निष्पक्षपणे पत्रकारितेचा ठसा उमटवला आहे. तसेच जिल्ह्यातील अचूक बातम्यांचा वेध घेत त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न आणि आवाज उठवण्याचा आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.