BANNER

The Janshakti News

माळवाडी व खंडोबाचीवाडी येथे आद्यक्रांतिवीर नरवीर राजे उमाजीराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी...











भिलवडी | दि. ७ / ९ / २०२१

आद्य क्रांतीवीर राजे उमाजीराव नाईक यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या भिवडी या गावी ७ सप्टेंबर १७९१ रोजी झाला होता.  मराठे शाहिच्या उत्तरार्ध पेशवाई बुडाल्यानंतर भारतावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला होता. तेव्हा आद्य क्रांतिवीर , खंडोबाचे भक्त राजे उमाजीराव नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध पहिले बंड पुकारले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गनिमी काव्याचा वापर करत या नरवीरांने   सर्व जाती धर्मांना एकत्रित करून इंग्रजांना सळो की पळो करून ठेवले होते. अशा या आद्य क्रांतिवीर राजे उमाजीराव नाईक यांची आज २३० वी जयंती खंडोबाचीवाडी (मदने मळा) ता.पलूस येथे  कोरोनाच्या अनुशंगाने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 


यावेळी खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक मा.धनाजी गायकवाड यांनी आद्य क्रांतिवीर राजे उमाजीराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन केले व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 



यावेळी खंडोबाचीवाडी ग्रा.पं.सदस्य  उत्तम जाधव , ग्रा.पं.सदस्या सौ. अश्विनी आशिष मदने , सम्राट ग्रुपचे अध्यक्ष सचिन माळी , सम्राट ग्रुपचे सदस्य शीतल मदने , सूनील मदने , अनिल मदने , आशिष मदने , सचिन मदने , गणेश मोटकट्टे , संग्राम मोटकट्टे , रवींद्र यादव (माळवाडी) , संदीप माळी , संजय कुंभार व मदने मळयातील समाज बांधव उपस्थित होते.
 


त्याच बरोबर माळवाडी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजीराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी निवास मोटकट्टे , करण मोटकट्टे , रोहित मदने , अंकुश मोटकट्टे ,  किरण मोटकट्टे ,संदिप मोटकट्टे सह  समाज बांधव उपस्थित होते.