BANNER

The Janshakti News

पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्या.. अन्यथा तहसिल कार्यालयावर मोर्चा काढणार.. मनसेचा सुचक इशारा...

पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्या..
अन्यथा  तहसिल कार्यालयावर मोर्चा काढणार.. मनसेचा सुचक इशारा...

पाच दिवसांचा दिला अल्टीमेटम...
भिलवडी : ता. पलूस दि.५/९/२०२१

कृष्णा नदीला महापूर येऊन एक महिना होऊन गेला तरीदेखील शासनाने भिलवडी व परीसरातील  पूरग्रस्तांना  जाहीर केलेली तातडीची मदत व नुकसान अनुदान अद्याप पर्यंत मिळालेले नाही. कोरोनाचे संकट , लॉकडाऊन , अतिवृष्टी व कृष्णा नदीला आलेला महापूर या एकामागून एक येणाऱ्या संकटालामुळे भिलवडी व परिसरातील नागरिकांची अवस्था अत्यंत बिकट झालेले आहे. त्यामुळे  भिलवडी व परिसरातील पूरग्रस्तांचे तातडीची मदत व अनुदान पुढील पाच दिवसात न मिळाल्यास  पलुस तहसिल कार्यालयावर मोर्चा काढत मनसेस्टाईलने आंदोलन छेडणार असल्याचा सुचक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मा. रोहित भोकरे यांनी दिला आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.