BANNER

The Janshakti News

मला समजलेले भाऊसाहेब..

नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ! 

भाऊसाहेब...ही वेक्ती अतिशय अभ्यासू ,मनमिळाऊ आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर तळमळीने प्रभावी काम करणारी व्यक्ती होय.... 

एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन लहानपणापासून परिस्थितीचे ज्वलंत चटके सहन करत एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा ते एका वृत्तवाहिनीच्या संस्थापक, संपादकपदी आज विराजमान झाला हे दृश्य डोळ्यांचे  पारणे फेडणारे होते . परिस्थितीचे चटके सहन करीत ऐन तारुण्यामध्ये एका भीषण अपघातामध्ये त्यांच्या पायाला अपंगत्व आले....खर तर हा काळ आर्थिक कसोटीचा आणि मानसिक प्रबळ आत्मविश्वासाचा अतिशय कठोर काळ होता असे म्हणावे लागेल.... पण आपल्या पायाला अपंगत्व आल्यानंतरही नथांबता प्रवाहाच्या उलट जाऊन समाजसेवेचा वसा हाती घेऊन अविरतपणे चालण्याचा त्यांचा माणस हा शरीराने धष्टपुष्ट असणाऱ्या तरुणाईलाही लाजवेल असाच आहे. आयुष्यामध्ये आलेल्या खडतर परिस्थितीत प्रबळ महायोद्धा प्रमाणे सामर्थ्य दाखवत सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन उत्कृष्ट समाजसेवक असे नावलौकिक होण्यासाठी त्यांनी काही कायद्याच्या चौकटीत राहून प्रभावी कामाची वाटचाल केली.  
सामाजिक क्षेत्रा नंतर राजकीय क्षेत्रामध्ये विस्थापित राजकारण्यांच्या विरोधात जाऊन सर्वसामान्य नागरिकांना दिशा देण्याचे काम त्यांनी प्रभावीरीत्या केले. 

आपल्या देशाच्या संविधानाचा आदर करीत त्यांनी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजेच पत्रकारिता या क्षेत्रांमध्ये त्यांनी पदार्पण केलं . उत्कृष्ट बातमीदार, उत्कृष्ट वक्ता, उत्कृष्ट लेखक, प्रभावी विचारधारा या सर्व कौशल्यांचा पुरेपूर उपयोग करीत एका न्यूज चॅनलच्या महाराष्ट्र राज्य मुख्य संपर्कप्रमुख व उपसंपादकीय पदभार उत्कृष्टपणे नाविन्यपूर्ण स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला.... बरेच दिवस अभ्यास करून आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय योग्य दिशेने घेऊन त्यांनी
द' जनशक्ती न्यूज पोर्टल ची स्थापना केली आहे.
मी त्यांच्या पुढील उज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या उत्कृष्ट संपादकीय प्रवासासाठी मनस्वी शुभेच्छा देतो... 
 
आपला शुभचिंतक, पत्रकार :- सुरज हाजीलाल शेख...