BANNER

The Janshakti News

जनतेच्या सेवेसाठी "द जनशक्ती न्यूज" माध्यम समूहाचा उद्घाटन सोहळा संपन्न

 जनतेच्या सेवेसाठी "द जनशक्ती न्यूज" माध्यम समूहाचा उद्घाटन सोहळा संपन्न


भिलवडी | दि.२६ / ०८ /२०२१ 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन अगदी साध्य पध्दतीने  दिमाखदार व अस्मरणीय असा " द जनशक्ती न्यूज " या पोर्टलचा  उद्घाटन सोहळा  माळवाडी ( भिलवडी ) ता. पलूस येथे बुधवार दि. २५ ऑगस्ट २०२१ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.

भिलवडी , माळवाडी व परीसरात सामाजिक क्षेत्रात निस्वार्थीपणे गेल्या २७ वर्षांपासून काम करीत असलेले व कमी कालावधीत पत्रकारिता क्षेत्रात नांव लौकिक मिळविणारे माळवाडी ( भिलवडी ) येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब रुपटक्के यांनी स्वतः नव्याने सुरु केलेल्या " द. जनशक्ती " न्यूज चॅनलचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
 या दिमाखदार सोहळ्यास भारत मातेचे रक्षण करणारे माजी सैनिक मा. गैबीसाहेब शेख (मेजर) , कृष्णाकाठ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मा. अमोल वंडे सर , दर्पण न्यूज चे मुख्यसंपादक मा. अभिजीत रांजणे , पत्रकार मा. मोसिन वांकर , पत्रकार मा. सुरज शेख , पत्रकार मा. नितीन काळे , पत्रकार मा. सचिन टकले , मा. संग्राम मोटकट्टे ,  मा. बाळासाहेब वाघमारे , मा. सलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

मेजर गैबीसाहेब शेख व दर्पण न्यूज चे संपादक अभिजीत रांजणे  यांच्या हस्ते नुतन " जनशक्ती न्युज " चॅनलच्या बोर्डाची फित कापून व डिजिटल मिडियावरती " द जनशक्ती न्यूज " चॅनलची लिंक ओपन करून उद्घाटन करण्यात आले.



यावेळी मेजर गैबीसाहेब यांच्या हस्ते  नुतन  " द.जनशक्ती न्यूज " चॅनलचे मुख्यसंपादक भाऊसाहेब रुपटक्के यांचा शाल, श्रीफळ, व गुलाब पुष देऊन सत्कार करण्यात आला. 

मा. मेजर गैबीसाहेब शेख , दर्पण न्यूजचे मुख्यसंपादक मा. अभिजीत रांजणे , प्रा. अमोल वंडे ,  पत्रकार मोसीन वांकर , पत्रकार सुरज शेख , पत्रकार सचिन टकले , यांनी आपले  मनोगत व्यक्त केले. व  प्रत्येकाने आपल्या मनोगतामध्ये  अत्यंत महत्त्वाच्या अशा  बारीक सारीक गोष्टींचे मार्गदर्शन केले.    निस्वार्थी समाज कार्य , निर्भिड पत्रकारिता व स्वतः नवीन चॅनल  सुरु करण्याचे धाडस या बद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी भाऊसाहेब रुपटक्के यांचे तोंड भरून कौतुक केले व त्यांना व त्यांच्या " द. जनशक्ती न्युज " चॅनलच्या  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भाऊसाहेब रुपटक्के यांनी केले तर आभार पत्रकार सचिन टकले यांनी मानले.