yuva MAharashtra पलूसमध्ये रविवारी ‘यशवंत स्मृती व्याख्यानमाला’! प्रबोधनकार इंद्रजीत देशमुख यांचे लाभणार मार्गदर्शन; किल्ला स्पर्धेतील विजेत्यांचा होणार गौरव

पलूसमध्ये रविवारी ‘यशवंत स्मृती व्याख्यानमाला’! प्रबोधनकार इंद्रजीत देशमुख यांचे लाभणार मार्गदर्शन; किल्ला स्पर्धेतील विजेत्यांचा होणार गौरव



पलूस दि. २७ : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त पलूस येथे रविवारी (दि. २९ नोव्हेंबर) भव्य ‘यशवंत स्मृती व्याख्यानमाले’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने आयोजित किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते, विचारवंत आणि प्रबोधनकार मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) यांचे प्रमुख मार्गदर्शन या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

       प्रबोधनकार मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी)
                       प्रदीप (आप्पा) कदम

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष प्रदीप (आप्पा) कदम यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कराड-तासगाव रोडवरील शिवशंभो मल्टीपर्पज हॉल, पलूस येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध व्याख्याते इंद्रजीत देशमुख (काकाजी) उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, समाजामध्ये वैचारिक प्रबोधन घडवून आणणे आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याच्या उद्देशाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण व्हावी, गड-किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारशाची ओळख व्हावी तसेच संस्कारमूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप (आप्पा) कदम यांनी केले आहे.


_________________________________________

_________________________________________






🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰