yuva MAharashtra खंडेश्वर पाणीपुरवठा संस्थेच्या निवडणुकीत खंडोबा विकास पॅनेलचा दणदणीत विजय! जय मल्हार पॅनेलला धक्का; गुलालाची उधळण करत विजयी जल्लोष!

खंडेश्वर पाणीपुरवठा संस्थेच्या निवडणुकीत खंडोबा विकास पॅनेलचा दणदणीत विजय! जय मल्हार पॅनेलला धक्का; गुलालाची उधळण करत विजयी जल्लोष!



भिलवडी दि. २४ : खंडोबाचीवाडी ता. पलूस येथील श्री खंडेश्वर सहकारी शेती पाणीपुरवठा संस्था नंबर २ च्या पंचवार्षिक निवडणुकीत खंडोबा विकास पॅनेलने ऐतिहासिक विजय मिळवत संस्थेवर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
जय मल्हार विकास पॅनेल आणि खंडोबा विकास पॅनेल यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत खंडोबा विकास पॅनेलने बाजी मारत उर्वरित सर्वच्या सर्व १२ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागून राहिलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

सन २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी ही पंचवार्षिक निवडणूक पार पडली.

रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत श्री खंडेश्वर सहकारी शेती पाणीपुरवठा संस्था नंबर २, खंडोबाचीवाडी येथे शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली.

त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.

या संस्थेच्या एकूण १३ संचालक पदांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती.

यापैकी माळवाडी येथील अशोक माने हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे उर्वरित १२ जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक झाली.

या निवडणुकीत खंडोबा विकास पॅनेल आणि जय मल्हार विकास पॅनेल यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली.

अखेर मतमोजणीचा निकाल जाहीर होताच खंडोबा विकास पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत सर्वच्या सर्व १२ जागांवर आपले उमेदवार निवडून आणले.

या निवडणुकीत खंडोबा विकास पॅनेलकडून विजयी झालेले १२ उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.


१. उत्तम मारुती जाधव
२. जैनुद्दीन बादशहा जमादार
३. भगवान मारुती कदम
४. अमोल धनपाल किनीकर
५. लव्हू रामचंद्र मगदूम
६. विजय ज्योतीराम शिंदे
७. विशाल बाबासो शिंदे
८. शुभम भानुदास तावदर
९. छाया सदाशिव खोत
१०. कमल दिनकर माळी
११. राहुल नामदेव भस्मे
१२. प्रकाश बाबू टकले
या सर्वच्या सर्व १२ उमेदवारांनी विजय मिळवत खंडोबा विकास पॅनेलचे संस्थेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार आणि समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि जोरदार घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला.

या निवडणुकीत शिवाजी माने, गोमटेश चिंचवडे, कृष्णा पवार , बाळासाहेब जमादार, माणिक माने, विलास मगदूम, संभाजी खोत, लालासो सावंत, दिलीप धनवडे, विशाल अरुण शिंदे, हनुमंत सुरेश मगदूम, वैभव शिंदे, प्रशांत शिंदे, हनुमंत महादेव मगदूम आणि संपत हवालदार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पॅनेलच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

दरम्यान, या निवडणुकीत एकूण १६२ सभासद मतदानासाठी पात्र होते. त्यापैकी तब्बल १५५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे या निवडणुकीत ९५.६८ टक्के इतके मतदान झाले.

 निवडणुकीची प्रक्रिया सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पलूस येथील मानसिंगराव पाटील यांच्या देखरेखीखाली पार पडली.

एकूणच, श्री खंडेश्वर सहकारी शेती पाणीपुरवठा संस्था नंबर २ च्या निवडणुकीत खंडोबा विकास पॅनेलने मिळवलेला हा विजय भिलवडी परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

या निवडणुकीतील संपूर्ण घडामोडी आणि विजयी जल्लोषाचे क्षण पाहण्यासाठी पाहत राहा...

द जनशक्ती न्यूज!