सांगली, दि. 9 (जि. मा. का) : 'सेवा संकल्प कार्यक्रमा'अंतर्गत पलूस तालुक्यातील भिलवडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय स्वयंसहायता शेतकरी बचत गटाला समतादूत सागर आढाव यांनी प्रत्यक्ष सदिच्छा भेट दिली. या बचत गटास समाज कल्याण विभागामार्फत 'मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत' ट्रॅक्टरचा लाभ मिळालेला आहे. या पार्श्वभूमिवर घेतलेल्या या भेटीदरम्यान बचत गटाच्या सदस्यांनी समाज कल्याण कार्यालयाचे आभार मानले. मिनी ट्रॅक्टरमुळे शेतीच्या कामांना वेग मिळाला असून, आर्थिक उत्पादनामध्ये मोलाचा हातभार लागला आहे. परिणामी, सदस्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर सुधारण्यास मोठी मदत झाल्याची भावना यावेळी सदस्यांनी व्यक्त केली.
या वेळी बचत गटाचे अध्यक्ष उमेश कांबळे, सचिव विजय कांबळे यांच्यासह बचत गटाचे प्रमुख सदस्य उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


