नागठाणे दि. २२ : हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भगवान अडीसरे यांच्या भावजय उज्वला हनमंत अडीसरे (वय ५५) यांचे सोमवार दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
उज्वला अडीसरे यांच्या निधनाने अडीसरे कुटुंबीय, नातेवाईक व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन विधी बुधवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता नागठाणे, ता. पलूस येथे होणार आहे.
अडीसरे कुटुंबीयांच्या दुःखात द जनशक्ती न्यूज परिवार व वांकर परिवार (नागठाणे) सहभागी असून, दिवंगत उज्वला अडीसरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



