yuva MAharashtra नवोदय विद्यालयाच्या नववी, अकरावीच्या प्रवेश परीक्षा अर्जासाठी 30 सप्टेंबरची मुदत

नवोदय विद्यालयाच्या नववी, अकरावीच्या प्रवेश परीक्षा अर्जासाठी 30 सप्टेंबरची मुदत



सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : सी.बी.एस.ई अभ्यासक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात भारत सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय या निवासी विद्यालयासाठी रिक्त होणाऱ्या जागांसाठी इ. 9 वी व इयत्ता अकरावी करिता होणारी प्रवेश परीक्षा शनिवार, दिनांक 10 एप्रिल 2027 रोजी सकाळी 10 ते दु.1.30 या वेळेत जवाहर नवोदय विद्यालय, पलूस जि. सांगली या परीक्षा केंद्रावर होणार आहे. या प्रवेश परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026 आहे. सांगली जिल्ह्यातील इ. 8 वी व इयत्ता 10 वीच्या वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. तरी पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय पलूसचे प्रधानाचार्य यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

परीक्षेचे ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांच्या पालकांनी www.navodaya.gov.in या संकेतस्थळावरुन भरण्याचे आहेत.

 नववी प्रवेशासाठी पात्रता :-  विद्यार्थी 8 वीच्या वर्गात सांगली जिल्ह्यातील मान्यताप्राप्त विद्यालयात शिकत असला पाहिजे. उमेदवाराचा जन्म ०१/०५/२०१२ पूर्वी किंवा ३१/०७/२०१४ नंतरचा नसावा. नववीच्य विद्यार्थ्यांनी https://cbseitms.nic.in/2026/nvsxi9  या संकेतस्थळावरुन भरावेत.

अकरावी प्रवेशासाठी पात्रता :- शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये विद्यार्थी 10 वीच्या वर्गात सांगली जिल्ह्यातील मान्यताप्राप्त सीबीएसई बोर्ड अथवा राज्य परीक्षा मंडळ संलग्न विद्यालयात शिकत असला पाहिजे. उमेदवाराचा जन्म ०१/०६/२०१० पूर्वी किंवा ३१/०७/२०१२ नंतरचा नसावा. अकरावीच्या विद्यार्थ्यांनी https://cbseitms.nic.in/2026/nvsxi11  या संकेतस्थळावरुन भरावेत.

प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यासाठी www.navodaya.gov.in  किंवा संबंधित संकेतस्थळावरुन पहिल्यांदा Candidates Click here for Registration वर अर्ज भरण्यास सुरुवात करावी. विद्यार्थ्यांचा फोटो, सही व पालकांची सही अपलोड करुन व सर्व माहिती व्यवस्थित भरून आपला ऑनलाईन अर्ज यशस्वी झाल्यानंतर त्याची प्रिंट घ्यावी, याची नोंद सर्व पालकांनी घेणे अनिवार्य आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करतेवेळी पालकांनी स्वतःचा चालू मोबाईल क्रमांक नमूद करणे गरजेचे आहे, अर्ज अपूर्ण राहिला तर समिती त्याला जबाबदार राहणार नाही. जवाहर नवोदय विद्यालय 9 वी व 11 वी प्रवेश परीक्षा 2027 संदर्भातील अधिक माहिती www.navodaya.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰