yuva MAharashtra महाराष्ट्र शिक्षक पात्रता आता 28 जूनला

महाराष्ट्र शिक्षक पात्रता आता 28 जूनला

 


 

        सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे कार्यालयामार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET)-2026 परीक्षा सुधारित तारखेनुसार रविवार, दि. 28 जून 2026 रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

           

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET)-2026 परीक्षा यापूर्वी रविवार, दि. 21 जून 2026 रोजी होणार होती. मात्र, त्याच दिवशी राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) मार्फत देशभरात NEET परीक्षा आयोजित करण्यात येत असल्याने दोन्ही परीक्षांची केंद्रे मोठ्या प्रमाणात एकच येत असल्याची बाब लक्षात घेऊन MAHATET परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षार्थींची गैरसोय टाळण्यासाठी आता ही परीक्षा रविवार, दि. 28 जून 2026 रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढण्याची सुविधा दि. 16 ते 28 जून 2026 पर्यंत उपलब्ध राहणार आहे. तसेच शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक १ हा रविवार, दि. 28 जून 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 या वेळेत होईल. तर पेपर क्रमांक 2  हा त्याच दिवशी दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडणार आहे.

 

प्रशासकीय अडचणीमुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल याची परीक्षार्थींनी नोंद घ्यावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰