सांगली दि. ०५ : सांगली जिल्ह्यातील
कडेपूर येथे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष व पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा. श्री पृथ्वीराज (बाबा) देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.
वाढदिवसाचे आयोजन पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या कडेपूर येथील निवासस्थानी करण्यात आले होते. यावेळी राज्याचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पृथ्वीराज बाबा देशमुख यांना शुभेच्छा दिल्याने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
भारतीय जनता पार्टीची ‘मुलुखमैदानी तोफ’ आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, क्रांति सह. साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड, माजी आमदार सदाशिव पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.
सर्व मान्यवर व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापून पृथ्वीराज बाबा देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व एकनाथ शिंदे, तसेच मंत्री छ. शिवेंद्रराजे भोसले, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, आ. रवींद्र चव्हाण, खा. उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक राजकीय मान्यवरांनी फोनवरून पृथ्वीराज बाबा यांना शुभेच्छा दिल्या.
सकाळच्या सत्रात आई सौ. देवयानी देशमुख, पत्नी वृषालीताई देशमुख व कुटुंबीयांच्या हस्ते औक्षण करण्यात आले. त्यानंतर डोंगराई देवीचे दर्शन घेऊन देशमुख यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थिती लावली.
जिल्हा बँकेचे संचालक, नगराध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी, तसेच तालुक्यातील अनेक गावांतील कार्यकर्त्यांची दिवसभर लक्षणीय उपस्थिती दिसून आली.
कवठेमहांकाळ, कडेगाव व पलूस तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
एकूणच, कडेपूरमध्ये झालेला हा वाढदिवस सोहळा राजकीय शक्तीप्रदर्शन आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा अनोखा संगम ठरला.
हेही पहा...
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰






