कडेगाव, दि. ०७ : भारतीय जनता पक्षाचा 46 व्या वर्धापनदिन सोमवार दि. ०६ एप्रिल रोजी कडेगाव (जि. सांगली) येथे उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
मान्यवरांच्या हस्ते पक्षध्वजाचे ध्वजारोहण करून त्यानंतर भारतमाता, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी बोलताना शरद लाड यांनी जुन्या कार्यकर्त्यांच्या संघर्ष आणि त्यागाची आठवण करून देत पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. “भाजपची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून संघटन बळकट करणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड यांनी पक्षाच्या स्थापनेपासूनच्या संघर्षमय प्रवासाचा आढावा घेत विचारधारा आणि कार्यपद्धतीवर मार्गदर्शन केले. महिलांचे सक्षमीकरण आणि संघटन बळकटीसाठी केंद्र व राज्य शासनाचे योगदान उल्लेखनीय असल्याचे माजी सभापती मंदा करांडे यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष धनंजय देशमुख, माजी उपनगराध्यक्ष अमोल डांगे, मंडल अध्यक्ष विकास सूर्यवंशी, संदीप गायकवाड, पंचायत समिती सदस्या पूनम माळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल मोहिते यांनी केले तर आभार प्रदर्शन महेंद्र करांडे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि संघटनात्मक एकतेचा संदेश देणारा ठरला.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰




