yuva MAharashtra हजारवाडीच्या महालक्ष्मी देवीची रविवारी यात्रा.

हजारवाडीच्या महालक्ष्मी देवीची रविवारी यात्रा.



भिलवडी, दि. ०६ मार्च २०२६ 

हजारवाडी ता पलूस येथील  श्री महालक्ष्मी देवीची यात्रा रविवार दिनांक 8 रोजी रंगपमचमी दिवशी होत आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 



हजारवाडी चे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा दरवर्षी प्रमाणे यावर्षीही रंगपंचमी दिवशी भरत आहे. हजारवाडीची महालक्ष्मी खूप जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. यात्रेला मोठी गर्दी असते. सायंकाळी 7 वाजता सवाद्य पालखी सोहळा पार पडणार आहे. याचदिवशी रात्री तमाशाची परंपरा आहे. माया मलकापूरकर यांचा लोकनाट्य तमाशा होईल.

सोमवारी 9 रोजी सकाळी 10 वाजता एकनाथ शष्टी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. याचदिवशी संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. आणि रात्री सारेगमप हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰