सांगली, दि. 04 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने 9 ऑक्टोबर 2025 रोजी ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, 2025’ प्रसिद्ध केला आहे. या आदेशाच्या भाग आठ मधील परिच्छेद 16 अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, समाजमाध्यमे इत्यादी माध्यमाव्दारे कोणत्याही प्रचारविषयक जाहिराती देता येणार नाहीत, असे या आदेशात सूचित करण्यात आले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



