yuva MAharashtra जनतेच्या संरक्षणासाठी काँग्रेसला निवडून द्या.... आ.डॉ.विश्वजीत कदम ; भिलवडीत खा. विशाल पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभा संपन्न..

जनतेच्या संरक्षणासाठी काँग्रेसला निवडून द्या.... आ.डॉ.विश्वजीत कदम ; भिलवडीत खा. विशाल पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभा संपन्न..



भिलवडी वार्ताहर : दि. ०५ फेब्रुवारी २०२६

आज नशेखोरी वाढली आहे. अक्षरशः नशेखोरांचा बाजार झाला आहे. तरूण पिढी बरबाद होत आहे. ती होवू नये यासाठी आणि जनतेच्या संरक्षणासाठी काँग्रेसला निवडून द्या असे आवाहन माजी मंत्री व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रतिक पाटील, माळवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार हजराबी सलामत, वसगडे पंचायत समिती गणाच्या उमेदवार शोभाताई हजारे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.



खासदार विशाल पाटील, पुणे महापालिकेचे गटनेते चंदुशेठ कदम, गावचे प्रमुख नेते राजूदादा पाटील  यांची प्रमुख उपस्थिती होती.



आ.डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, 

लोकनेते स्व. बाळासाहेब काका पाटील यांचे कुटुंब नेहमीच सर्वांच्या पाठीशी राहिले आहे. स्व. संग्राम दादा पाटील यांच्या कार्याचा वारसा प्रतिक पाटील चालवत आहेत. बाळासाहेब काका यांच्याबद्दल ग्रामस्थांत आस्था होती. जनतेला त्यांनी सांभाळले. त्यांच्या पश्चात संग्राम दादा पाटील यांनीही लोकांना प्रेम दिले. या गावाने स्व. आनंदराव भाऊ मोहिते, स्व. शिवराम बापू यादव यांच्यासारखे अनेक नेतृत्व जिल्ह्याला दिली आहेत. 

ते म्हणाले, गेल्या काही वर्षांत अनेक निवडणुका झाल्या नाहीत. जाणीवपूर्वक त्या पुढे ढकलल्या. कारण लोकांतून निवडून आलेली माणसं भाजपला आवडत नाही. 

भाजप सरकारला लोकांचा आवाज ऐकायचा नाही. म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे.

गेल्या चार वर्षात तो आवाज बंद होता. कारण प्रशासक होते. लोकांचं म्हणणं कोण ऐकून घेत नव्हतं. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर 

स्व.डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या विचारांनी आपल्याला उमेदवार पाठवायचे आहेत. मतं मागायला येणाऱ्या भाजपच्या लोकांना 

एकच प्रश्न विचारा की मत मागायला येता, कोरोना आणि महापूरात कुठं होता. जनतेचा आपल्यावर विश्वास आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आपला विजय नक्की असल्याचा विश्वास वाटतो.




खासदार विशाल पाटील म्हणाले, 

भाजप निवडून येण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसे वाटप करतो. आज नशेखोरीत पुर्ण जिल्हा बुडाला आहे. याचा 

दोष सरकारवर आहे. कारण कायदा व सुव्यवस्था राहिली नाही. 

राज्यात व देशात सत्ता भाजपची आहे. त्यांनी बंदोबस्त करायला हवा. आपण सुरक्षित नाही. 

राज्य व्यवस्थित न चालवणारे आपणास मत मागतात तो अधिकार त्यांना नसल्याचे सांगितले. महिलांचा सन्मान करण्याचे काम राहुल गांधीनी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक आदल्या दिवशी लाडकी बहिण व तिचे निवडणुकीपूर्वी होणारे होणारे वाटप यावर त्यांनी सडकून टीका केली. भाजपला धडा शिकविण्यासाठी या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन केले.


चंदुशेठ कदम म्हणाले, 

सत्ता मिळवण्यासाठी भाजप  काहीही करेल. स्व. पतंगराव कदम साहेब यांनी या भागाचे नंदनवन केले आहे. सूत्रसंचालन दीपक पाटील व आभार सचिन पाटील यांनी मानले.

अनेक नेतेमंडळींनी भाषणे केली. महिला व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰