yuva MAharashtra जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते बँक ऑफ इंडियाच्या आष्टा शाखेचे उद्घाटन

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते बँक ऑफ इंडियाच्या आष्टा शाखेचे उद्घाटन

 



सांगली, दि. ३ : बँक ऑफ इंडियाच्या आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली येथील नवीन शाखेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या प्रसंगी बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विभागाचे उपव्यवस्थापक विशाल कुमार सिंग, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी राहुल गुप्ता आदि उपस्थित होते.

नागरिकांनी बँकिंग व डिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, नवीन शाखा सुरू झाल्याने नागरिकांना बचत व चालू खाते, कर्जविषयक सेवा, डिजिटल बँकिंग तसेच अन्य सेवा अधिक सुलभपणे मिळणार आहेत, असे ते म्हणाले.

प्रास्ताविकात जिल्हा अग्रणी प्रबंधक विश्वास वेताळ म्हणाले, बँक ऑफ इंडिया ही देशातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून ग्राहकाभिमुख व आधुनिक बँकिंग सेवा देण्यात आघाडीवर आहे. 7 सप्टेंबर 1906 रोजी मुंबई येथे स्थापनेपासून बँकेने सातत्याने प्रगती केली आहे. सध्या बँकेच्या देशभरात 5300 पेक्षा अधिक शाखा आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये ही 41 वी शाखा असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी सुशांत राहुल, सुशांत मुळीक, महेश पाटील, संदीप भोरडे, निखील सावळे, दिग्विजय केने, शंतनू गारगे, अमित कोरे, ज्ञानेश्वर गोंडे, त्रिशूल देसाई आदि उपस्थित होते. विशाल कुमार सिंग यांनी आभार मानले.




🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰