मुंबई, दि. १३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2025 ते 31 डिसेंबर, 2025 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च, 2026 असा आहे.
राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
पुरस्कारांची माहिती
अ.क्र. | पुरस्काराचे नाव | पारितोषिक |
1. | अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय) | रु.1 लाख रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
2. | बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) | 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
3. | अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)
| 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
4. | बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) | 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
5. | मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर) | 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
6. | यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) | 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
7. | पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर) | 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
8. | तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) | 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
9. | केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) | 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
10. | समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर) | 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
11. | स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) | 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰 |


