yuva MAharashtra ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत

 


ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी

अर्ज करण्याची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत

  

        सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतेलेल्या पदवी आणि पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रमास (व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम) महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षांकरिता ऑनलाईन अर्ज दि.15 फेब्रुवारी 2026 पर्यंत hmas.mahait.org या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट  इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालयात दि. 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत जमा करणे बंधनकारक आहे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालयाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी केले आहे.

 

            राज्यातील सर्वमहानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मान्यताप्राप्त शासकिय, अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जमाती – क धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु करण्यात आली आहे.

            

            या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद|यार्थ्यांना व ज्यांच्या पालकाचे उत्पन्न रक्कम रुपये 2.50 लक्ष पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रतिवर्ष रक्कम रु.43,000/- व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रतिवर्ष रक्कम रु.38,000/-प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे.  महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जमाती - क धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


           

 

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या लाभासाठी

अर्ज करण्याची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत

 

 

           सांगली, दि. 11 (जि. मा. का.)  : पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतेलेल्या पदवी आणि पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रमास (व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम) महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षांकरिता ऑनलाईन अर्ज दि.15 फेब्रुवारी,2026 पर्यंत hmas.mahait.org या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालयात दि. 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत जमा करणे बंधनकारक आहे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालयाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी केले आहे.

 

            राज्यातील सर्व महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मान्यताप्राप्त शासकिय, अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असणाऱ्या भटक्या जमाती - क धनगर प्रवर्गातील विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे.

 

              या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना व ज्यांच्या पालकाचे उत्पन्न रक्कम रुपये- 2.50 लक्ष पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रतिवर्ष रक्कम रु.43,000/- व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रतिवर्ष रक्कम रु. 38,000/-प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰