yuva MAharashtra “एक दिवा सैनिकांसाठी” कार्यक्रम रविवारी

“एक दिवा सैनिकांसाठी” कार्यक्रम रविवारी

 


 

        सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून एक दिवा सैनिकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथे दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे.




 या कार्यक्रमात प्रामुख्याने जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा व त्यांचे अवलंबित यांच्यासोबत 'दिवाळी फराळ' व जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सांगली जिल्ह्यातील सर्व सर्व वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा व त्यांचे अवलंबित यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.


<><><><><><><><><><><<><><><<><><><



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰