yuva MAharashtra वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना तात्काळ निलंबित करून खातेनिहाय चौकशी करावी — वंचित बहुजन युनियनचा इशारा

वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना तात्काळ निलंबित करून खातेनिहाय चौकशी करावी — वंचित बहुजन युनियनचा इशारा



सांगली, दि. १६ ऑक्टोबर (प्रतिनिधी) –

वंचित बहुजन माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली यांच्या वतीने जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना तात्काळ निलंबित करून खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


जिल्हा संपर्कप्रमुख संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.

माहिती अधिकारातून मिळालेल्या शिक्षण उपसंचालक कोल्हापूर कार्यालयाच्या पत्र क्रमांक शिउर्स/प्राथ/2025/164 (दि. 19 ऑगस्ट 2025) आणि प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे पत्र क्रमांक प्राशिस/मा.अ./कांबळे/आस्था101/1/1395389/2025 (दि. 28 ऑगस्ट 2025) या पत्रांमधून गायकवाड यांच्याविरुद्ध गंभीर तक्रारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.



तरीही प्रशासनाने कारवाई न करता गायकवाड यांना मुदतवाढ दिली, यामुळे कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे युनियनने म्हटले आहे.


“गंभीर तक्रारी व उघड झालेले दस्तऐवज पाहता गायकवाड यांचे तत्काळ निलंबन अपरिहार्य आहे. अन्यथा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन उभारले जाईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदारी प्रशासनाची राहील,” असा इशारा श्री. संजय कांबळे यांनी दिला.



या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादा भुसे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तसेच शिक्षण संचालक, आयुक्त (शिक्षण) व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.


या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, महासचिव अनिल मोरे, महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे, कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, संगाप्पा शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


<><><><><><><><><><><<><><><<><><><



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰