yuva MAharashtra कायद्यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही- इस्लामपूर पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ वाघ.

कायद्यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही- इस्लामपूर पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ वाघ.



इस्लामपूर दि.  १८ : केंद्रीय पत्रकार संघाने  (ईश्वरपूर) इस्लामपूरचे नूतन पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ वाघ  यांचा सत्कार केला. त्याप्रसंगी ते बोलत होते.पत्रकारांवर हल्ले झाले तर आरोपीवर  पत्रकार संरक्षण हक्क कायद्याअंतर्गतच गुन्हे दाखल व्हावेत ही मुख्य मागणी आणि पोलीस स्टेशन आणि पोलीस प्रशासनाकडून पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळावी या संदर्भात निवेदनही यावेळी केंद्रीय पत्रकार संघाच्याव वतीने देण्यात आले.

 यावेळी केंद्रीय पत्रकार संघाचे राज्य प्रवक्ता श्री चंद्रशेखर क्षीरसागर सांगली जिल्हा अध्यक्ष श्री रवींद्र लोंढे, सदस्य श्री अमोल जाधव, ज्येष्ठ पत्रकार श्री डॉ सुनील पाटील , जेष्ठ पत्रकार श्री इलाही मुलाणी व इतर पत्रकार उपस्थित होते.

 


 यावेळी पुढे बोलताना पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ वाघ म्हणाले की येत्या काळामध्ये पत्रकारांची बैठक आयोजित करू. पोलीस प्रशासन  पत्रकारांच्या पाठीशी  ठामपणे राहील. पत्रकारावर हल्ले करण्याची कोणीही धाडस करणार नाही परंतु असेच काही घडले तर निश्चितपणे आरोपीवर पत्रकार संरक्षण कायदे अंतर्गतच गुन्हे दाखल करू असे आश्वासन त्यांनी बोलताना दिले. तालुक्यातील आणि शहरातील गुंडगिरीची दहशत मोडून काढू. कायद्यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही असेही ते पुढे म्हणाले.

 यावेळी बोलताना केंद्रीय पत्रकार संघाचे राज्य प्रवक्ते श्री चंद्रशेखर क्षीरसागर म्हणाले की  पोलीस प्रशासनाच्या चांगल्या कामाबाबतीत  सर्व पत्रकार कायमच सोबत असतील. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष श्री रवींद्र लोंढे म्हणाले की पोलीस प्रशासनाने त्यांचे काम  सर्वसामान्यांना न्याय देईल असेच करावे.

 आभार श्री ईलाई मुलानी यांनी मानले.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰