yuva MAharashtra अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे यांचा सांगली जिल्हा दौरा

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे यांचा सांगली जिल्हा दौरा



 

        सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे यांच्या दिनांक 9 व 10 सप्टेंबर 2025 रोजीच्या सांगली जिल्हा दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 

            मंगळवार, दि. 9 सप्टेंबर रोजी  सकाळी 10 वाजता मुख्याधिकारी, इस्लामपूर नगरपालिका यांच्या सोबत आढावा व कामाची पाहणी, भेटी, तपासणी व प्राप्त होणाऱ्या महसूलाचे एकूण 5 टक्के निधी आस्थापना, वजा खर्च, आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या खर्चाचा मागील 5 वर्षाचा आढावा व कामाची तपासणी तसेच अनुसूचित जाती जमाती साठी प्राप्त होणाऱ्या निधीबाबत आढावा व तपासणी. दुपारी 1 ते 2 राखीव.

 

            दुपारी 2 वाजता मुख्याधिकारी, आष्टा नगरपालिका यांच्यासोबत आढावा व कामाची पाहणी. भेटी व तपासणी, प्राप्त होणाऱ्या महसूलाचे एकूण 5 टक्के निधी आस्थापना, वजा खर्च, आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या खर्चाचा मागील 5 वर्षाचा आढावा व कामाची तपासणी तसेच अनुसूचित जाती जमाती साठी प्राप्त होणाऱ्या निधीबाबत आढावा व तपासणी.

 

            सायंकाळी 5 वाजता मुख्याधिकारी कडेगाव नगरपंचायत, पलूस नगरपंचायत, विटा नगरपालिका, तासगाव नगरपालिका, कवठेमहांकाळ नगरपालिका यांच्यासोबत आढावा व कामाची पाहणी, भेटी व तपासणी, प्राप्त होणाऱ्या महसूलाचे एकूण 5 टक्के निधी आस्थापना, वजा खर्च, आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या खर्चाचा मागील 5 वर्षाचा आढावा व कामाची तपासणी, तसेच अनुसूचित जाती जमातीसाठी प्राप्त होणाऱ्या निधीबाबत आढावा व तपासणी, शासकीय विश्रागृह मिरज येथे रात्री मुक्काम.

 

            बुधवार, दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयुक्त सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिका यांच्यासोबत आढावा व कामाची पाहणी, भेटी व तपासणी, महानगरपालिका यांना प्राप्त होणाऱ्या महसूलाचे एकूण 5 टक्के निधी आस्थापना, वजा खर्च, आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या खर्चाचा मागील 5 वर्षाचा आढावा व कामाची तपासणी, तसेच अनुसूचित जाती जमाती साठी प्राप्त होणाऱ्या निधीबाबत आढावा व तपासणी. दुपारी 1 ते 2 राखीव.

 

 दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी सांगली यांच्यासोबत संविधान बजेट व पोलीस अधीक्षक सांगली यांच्यासोबत अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत आढावा बैठक.

दुपारी 3 वाजता डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या घरी भेट. अभिवादन भुमी "आरग" गाव भेट. सोयीनुसार सांगली येथून पुणेकडे प्रयाण.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰