yuva MAharashtra मिरज शहरामध्ये प्रभाग क्र. 4, वार्ड क्रमांक 20 येथे सुरू असलेला बेकायदेशीर हाडे संकलित करणारा कारखाना त्वरित बंद करावा अन्यथा आंदोलन.- आर. पी. आय. (आठवले) मिरज शहर.

मिरज शहरामध्ये प्रभाग क्र. 4, वार्ड क्रमांक 20 येथे सुरू असलेला बेकायदेशीर हाडे संकलित करणारा कारखाना त्वरित बंद करावा अन्यथा आंदोलन.- आर. पी. आय. (आठवले) मिरज शहर.



सांगली दि. ८ :  सोमवार दि. 08/09/2025 रोजी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तथा जबाबदार अधिकारी यांना निवेदन करण्यात आले की, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीत प्रभाग क्रमांक 4 येथील वार्ड क्रमांक 20 येथे, मिरज कोल्हापूर रोड गोसावी गल्ली च्या उत्तरेस बेकायदेशीररित्या मृत/कत्तल झालेल्या जनावरांची हाडे व मांस संकलित करणारा बेकायदेशीर कारखाना सुरू आहे. सदरच्या कारखान्यामध्ये हाडे व कुजलेले मांस असल्याकारणाने नदीवेस बौद्ध वसाहत, गोसावी गल्ली, सिद्धार्थ झोपडपट्टी व आसपासच्या परिसरामध्ये अत्यंत दुर्गंधीयुक्त घाण वास पसरलेला आहे. तरी सदरचा कारखाना हा बेकायदेशीर रित्या चालू असून सदरच्या कारखान्यावर महानगरपालिकेने धाडसत्र टाकून त्वरित कारखाना बंद करावा याबाबतचे निवेदन आज आरोग्य विभागाच्या बारनिशी विभागाच्या लिपिक मा. कांबळे मॅडम यांना देण्यात आले.



यावेळी रिपब्लिकन (आठवले) पक्षाचे आय.टी. सेलचे मा. सांगली जिल्हाध्यक्ष, मा. योगेंद्र कांबळे, मिरज शहर अध्यक्ष, मा. अविनाश कांबळे, वाहतूक आघाडीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष, मा. नितिन कांबळे, मिरज शहर कार्याध्यक्ष, मा. शानूर पानवाले, आर. पी. आय. मिरज शहर सदस्य, मा. विशाल बेंगलोरे यांचे सह आदी कायकर्ते उपस्तिथ होते.


यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मा. योगेंद्र कांबळे म्हणाले, मिरज कोल्हापूर रस्त्यालगत गोसावी गल्ली येथे पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर रित्या जनावरांची हाडे तथा मांस संकलित करणारा बेकायदेशीर रित्या कारखाना सुरू आहे. सदरच्या कारखान्यांमध्ये जनावरांची हाडे, शिंगे, मांस तसेच इतर भाग संकलित करून ठेवले जातात. मेलेल्या जनावरांच्या मांसाची दुर्गंधी संपूर्ण परिसरामध्ये पसरते, नदीवेस बौद्ध वसाहत, गोसावी गल्ली, सिद्धार्थ झोपडपट्टी, तसेच आसपासचा परिसर या परिसरामध्ये सदरच्या कारखान्यांमध्ये ठेवलेल्या जनावरांच्या हाडांमुळे संपूर्ण वातावरणामध्ये दुर्गंधी पसरून जनतेला मळमळणे, उलट्या होणे, बेशुद्ध अवस्थेत पडणे, असे प्रकार या ठिकाणी घडत आहेत. तरी महानगरपालिका प्रशासनाने सदर कारखान्यास जनावरांची हाडे संकलित करण्याचा परवाना दिला आहे का??? नसल्यास सदरचा कारखाना बेकायदेशीर ठरवून तो कारखाना त्वरित जमिनी दोस्त करण्यात यावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष यांच्यावतीने सदरच्या कारखान्यातील हाडे महानगरपालिका कार्यालय परिसरामध्ये फेकण्यात येतील व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा दक्षतेचा इशारा देण्यात आला.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰