yuva MAharashtra कौशल्य विकास, रोजगार विभागातर्फे शुक्रवारी भरती मेळावा

कौशल्य विकास, रोजगार विभागातर्फे शुक्रवारी भरती मेळावा

 


सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तळमजला, विजयनगर, सांगली येथे शुक्रवार, दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत, प्लेसमेंट ड्राईव्ह/ भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 40 पेक्षा अधिक पदांकरिता सह्याद्री मोटर्स, प्रा.लि.सांगली, सुयश ग्रुप ऑफ इंडस्ट्री, कुपवाड इत्यादी नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये विविध पदांकरिता दहावी, बारावी, आय टी आय, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट या प्रकारची शैक्षणिक पात्रता असणाऱ्या रोजगार इच्छुक उमेदवारांच्या उपस्थित उद्योजक प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.

उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस येताना, आपली सर्व मूळ कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटाच्या किमान तीन छायांकित प्रती सोबत घेऊन याव्यात. अधिक माहितीसाठी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक - ०२३३ २९९०३८३


हेही पहा--




https://youtu.be/RsG9sLVOV8s?si=GwJJ9i-sJLoqgeF8



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰