सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गुरूवार, दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार, दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी 5.35 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथे महालक्ष्मी एक्सप्रेसने आगमन व शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण. सकाळी 5.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून खणबाग सांगलीकडे प्रयाण. सकाळी 9.45 वाजता आगमन व वुमन्स एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयास सदिच्छा भेट, स्थळ – श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, एस.टी. स्टॅण्ड रोड, शिवाजी मंडईजवळ, खणभाग, सांगली. सकाळी 10.30 वाजता भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग, रा.से.यो. कक्ष ( NSS Cell), महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “स्वच्छता ही सेवा” अभियान 2025 अंतर्गत “एक दिन, एक घंटा, एक साथ” राष्ट्र स्वच्छता अभियानाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती, स्थळ – श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, एस. टी. स्टॅण्ड रोड, शिवाजी मंडईजवळ, खणभाग, सांगली. सकाळी 11.15 वाजता दि मिरज एज्युकेशन सोसायटी मिरज च्या अत्याधुनिक शैक्षणिक संकुल नुतन इमारत बांधकामाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – ज्युबिली इंग्रजी कन्या शाळेचे क्रीडांगण, दत्त मंदिराजवळ मिरज. दुपारी 12.30 वाजता शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथे जिल्हा नियोजन निधीतून कार्यान्वीत सौर विद्युत प्रकल्प व अत्याधुनिक डिजीटल सुविधा प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती, स्थळ – शासकीय तंत्रनिकेतन, माजी सैनिक वसाहत जवळ, विद्यानगर, मिरज. दुपारी 1.30 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता भारतीय जनता पार्टी, सांगली ग्रामीण च्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – गिरनार टॉवर, 3 रा मजला, गेस्ट हाऊस चौक, सांगली-मिरज रोड, सांगली.
दुपारी 3 वाजता पालकमंत्री घरगुती गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – खरे मंगल कार्यालय, विश्रामबाग, सांगली. दुपारी 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.15 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6 वाजता श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – कै. पंडित भानुदास बुवा गुरव मार्ग, ब्राम्हणपुरी, मिरज. सायंकाळी 6.45 वाजता प्रभाग क्र. 9 येथील श्री स्वामी समर्थ मंदिर पारायण हॉल व संरक्षक भिंत लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, स्थळ – जयहिंद कॉलनी, विश्रामबाग रेल्वे गेट जवळ, सांगली. सायंकाळी 7.30 वाजता गजेंद्र फाऊंडेशन काकानगर सांगली आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गामाता देवी च्या आरतीस उपस्थिती, स्थळ – कर्नाळ रोड, काकानगर, सांगली. रात्री 7.45 वाजता श्री नवरात्री उत्सव मंडळ आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त देवी दर्शन व रास गरबा कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – श्री अंबाजी धाम, नवरात्री उत्सव मंडळ, रतनशीलनगर, सांगली. रात्री 8.15 वाजता गीतांजली फाऊंडेशन आयोजित नवरात्री उत्सव-2025 कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – कल्पद्रुम ग्राऊंड, नेमिनाथनगर, विश्रामबाग, सांगली. रात्री सोयीनुसार शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार, दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून कवठेमहांकाळकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता आगमन व श्री महांकाली नवरात्रोत्सवानिमित्त उपस्थिती, स्थळ – श्री महांकाली देव व मारूती देव, कवठेमहांकाळ. सकाळी 10.15 वाजता कवठेमहांकाळ नगरपंचायतीस सदिच्छा भेट. सकाळी 11 वाजता श्री अंबिका मंडळ संचलित श्री बाळासाहेब गुरव (बापू) हायस्कूल व ज्यु. कॉलेज, कवठेमहांकाळ यांच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण. दुपारी 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. दुपारी 1.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून राजवाडा चौक, सांगलीकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता आगमन व राखीव, स्थळ – सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका मुख्यालय राजवाडा चौक, सांगली. दुपारी 4 वाजता जिल्हा नियोजन निधीअंतर्गत गतीमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्था बळकटीकरण व जिल्हा परिषद स्वीय निधी अंतर्गत खरेदी फायबर ग्लास यांत्रिकी बोटीचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, स्थळ – सरकारी घाट, आयर्विन पुलाजवळ, सांगली. सायंकाळी 5 वाजता महिला व बालविकास अनुदानित जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण सांगली संस्थेस सदिच्छा भेट, स्थळ – सि. स. नं. 771, एक्सेंटशन मिरज रोड, सांगली. सायंकाळी 5.30 वाजता सांगली येथून कोल्हापूर निवासस्थानाकडे प्रयाण.
हेही पहा-
https://youtu.be/cLLlg_ZvEb0?si=s5frFubRW_xRDm8D
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰




