सांगली दि. १३ : सांगलीचे सतीश भूपाल सनदी यांची नॅशनल पीपल्स पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल सरकार यांच्या हस्ते सनदी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. ही घोषणा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी लोकसभाध्यक्ष स्व. पी. ए. संगमा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष अब्दुल सरकार यांनी सांगितले की, “नॅशनल पीपल्स पार्टी हा केंद्रातील सत्तेत असलेला भाजपसोबतचा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. पक्ष महाराष्ट्रात आपले संघटन अधिक बळकट करणार असून आगामी सर्व निवडणुकांमध्ये पक्ष रिंगणात उतरणार आहे.”
प्रदेशाध्यक्षांनी पुढे सांगितले की, पक्षाकडून पदवीधर मतदारसंघातून उमेदवार उभा केला जाणार असून पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
सतीश भूपाल सनदी यांच्या निवडीमुळे सांगली जिल्ह्यासह राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्य व्यापक प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰