yuva MAharashtra विशेष लेख : शाश्वत विकासाची दूरदृष्टीपूर्ण लोकचळवळ; "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान"

विशेष लेख : शाश्वत विकासाची दूरदृष्टीपूर्ण लोकचळवळ; "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान"

 


विशेष लेख : 

 

शाश्वत विकासाची दूरदृष्टीपूर्ण लोकचळवळ;

"मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान"

 

आपला भारत देश हा कृषिप्रधान आहे आणि गाव हे त्याचे प्राणकेंद्र आहे. त्यामुळे गावांचे प्रश्न सोडविल्याशिवाय आणि त्यांचा शाश्वत विकास साधल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही. शाश्वत विकास हा असा विकास आहेजो सध्याच्या पिढीच्या गरजा भागविताना पुढील पिढ्यांसाठी साधन संपत्तीचे सातत्याने संवर्धन करत राहतो. म्हणूनच गावांचा शाश्वत विकास हा आपल्या राज्याच्या व राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

आज अनेक गावांमध्ये शिक्षणआरोग्यरोजगाररस्तेपिण्याचे पाणीवीजपुरवठा या मूलभूत गरजांसह रोजगारमाहिती तंत्रज्ञानशाळांमध्ये शिक्षणाचा उच्च दर्जाशिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण सुविधाप्राथमिक आरोग्य केंद्रे तेथे औषधांची उपलब्धतातज्ञ डॉक्टरांची सेवा अशा प्राथमिक चांगल्या सुविधा उपलब्ध करणे यासाठी शासन मोठ्या प्रमाणात काम करते.

            या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियानाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी १७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. ही अंमलबजावणी केवळ स्पर्धात्मक राहणार नसून ग्रामविकास अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देणारी ठरेल.

हे अभियान राबविण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. २९ जुलै २०२५ रोजी राज्य मंत्रिमंडळाची यास मंजुरी मिळाली व अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महत्वाचे पाऊल टाकले गेले. अभियान राबविण्यासाठी ₹२९०.३३ कोटींची तरतूद करण्यात आलीत्यापैकी ₹२४५.२० कोटी पुरस्कारांसाठीतर उर्वरित निधी प्रचारप्रशिक्षण आणि मार्गदर्शनासाठी वापरण्यात येणार आहे.

 


 

अभियानाचे उद्दिष्ट

            या अभियानाचा मुख्य उद्देश गावागावात सुशासन प्रस्थापित करणेग्रामस्थांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करणे आणि विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण तयार करणे आहे. योजना केवळ प्रशासकीय यंत्रणेपुरती मर्यादित नसूनग्रामस्थांच्या थेट सहभागावर आधारलेली आहे.

 


 


ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास विभाग शाश्वत विकास साधण्यासाठी ठिबक सिंचनशेततळीबंधारेजलसंवर्धनजलयुक्त शिवार यांसारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहनरासायनिक खतांचा वापर टाळण्यासाठी प्रयत्नआवास योजनांतर्गत घरेमहिलांना बचतगटांच्या माध्यमातून सक्षम करणेतसेच दुग्धोत्पादनमधमाशीपालनमत्स्यव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांना चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. या प्रयत्नांना अभियानातून प्रोत्साहन मिळणार आहे.

 

अभियानाचे ७ प्रमुख घटक

 

१. सुशासनयुक्त पंचायत — पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन

२. सक्षम पंचायत — आर्थिक स्वावलंबनकंपनी सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) व लोकवर्गणी

३. जलसमृद्धस्वच्छ व हरित गाव — पर्यावरण संरक्षण व पाणी व्यवस्थापन

४. योजनांचे अभिसरण — मनरेगा व इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी

५. संस्था सक्षमीकरण — शाळाअंगणवाडीआरोग्य केंद्रे यांची बळकटी

६. उपजीविका विकास व सामाजिक न्याय — रोजगार निर्मिती व महिला सक्षमीकरण

७. लोकसहभाग व श्रमदान — ग्रामस्थांचा प्रत्यक्ष सहभाग व श्रमदान

खरं तर सातवा घटक वैशिष्ट्यपूर्ण असून गावकऱ्यांचा थेट सहभाग व श्रमदान याचा अर्थ लोकसहभाग व श्रमदान यातून हे अभियान लोकचळवळ बनणे अपेक्षित आहे. अभियानाला प्रोत्साहन देण्याचे काम पुरस्काराच्या रूपाने होईल. पुरस्कारांसाठी एकूण २४५.२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एकूण १९०२ यशस्वी स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. या गावांच्या विकास कामांसाठी या ग्रामपंचायतींना मोठा निधी उपलब्ध होईल.

 

पुरस्कार रचना :

 

 राज्यात प्रथम विजेत्या ग्रामपंचायतीस ५ कोटी रुपयांचा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जाईल. तर द्वितीय ३ कोटी रुपयेतृतीय २ कोटी रुपये पुरस्कार असेल .

विभागस्तरीय पुरस्कार -

प्रत्येक विभागात ३ ग्रामपंचायतीना पुरस्कार. प्रथम रुपये १कोटीद्वितीय रुपये ८० लाखतृतीय रुपये ६० लाख

जिल्हास्तरीय पुरस्कार -

प्रत्येक जिल्ह्यात ३ ग्रामपंचायतीना पुरस्कार. प्रथम रू ५० लाखद्वितीय रू ३० लाखतृतीय रुपये २० लाख

 

तालुकास्तरीय पुरस्कार :-

 

प्रत्येक तालुक्यात ३ ग्रामपंचायतीना पुरस्कार प्रथम रुपये १५ लाखद्वितीय रुपये १२ लाखतृतीय रुपये ८ लाख

विशेष पुरस्कार : प्रत्येकी तालुक्यातील २ ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५ लाख रुपये पुरस्कार आहे.

 

विभाग आणि राज्यस्तरावर पंचायत समित्यांसाठी आणि जिल्हा परिषदासाठी ही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

 

पंचायत समित्यांना ३ राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतील. प्रथम २ कोटीद्वितीय १.५ कोटीतृतीय १.२५ कोटी असे पुरस्कार आहे.

 

            विभागस्तरीय पुरस्कारांमध्ये प्रथम १ कोटीद्वितीय ७५ लाखतृतीय ६० लाख रुपये असे आहे

जिल्हा परिषदांना अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी राज्यात ३ जिल्हा परिषदांना पुरस्कार आहेत यात प्रथम ५ कोटीद्वितीय ३ कोटीतृतीय २ कोटी असे पुरस्कार दिले जातील.

 

या अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ असा असूनएकूण १०० गुणांच्या निकषांवर मूल्यांकन केले जाईल. पारदर्शक प्रशासनआरोग्यशिक्षणमहिला सक्षमीकरणरोजगारपर्यावरणकर वसुली आणि लोकसहभाग यांचा विचार केला जाईल. प्रत्येक ग्रामपंचायतीने दररोजचा अहवाल विशेष मोबाईल ॲप्लिकेशन आणि वेबसाईटवर सादर करावा लागेल.

 

अभियानापूर्वी राज्यस्तरीय कार्यशाळाजिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशिक्षणतसेच ग्रामसभांच्या माध्यमातून तयारी केली जाईल. व्यापक जनजागृतीसाठी कार्यशाळापोस्टरबॅनरसोशल मिडियायशोगाथा चित्रफीत आणि इतर साधनांचा उपयोग केला जाणार आहे.

 

राज्य आणि देशाच्या शाश्वत विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण ही प्रगतीची पहिली पायरी आहे. सक्षम युवा पिढी घडवण्यासाठी गावांमध्ये डिजिटल वर्गई-लर्निंगपुस्तकालयेतसेच कौशल्याधारित प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणे. यातून युवक युवतींना संगणकमोबाईल रिपेअरिंगइलेक्ट्रिकशिवणकामकारागिरी अशा विविध व्यवसाय शिक्षणातून कौशल्य दिल्यास रोजगार निर्मिती व उद्योजकता वाढेल. अशा गावाच्या विकासावर परिणाम करणाऱ्या सर्व घटकांना चालना देण्यावर या निमित्ताने लक्ष दिले जात आहे.

 

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही केवळ स्पर्धा नसून ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाची दिशा आहे. प्रत्येक ग्रामस्थाने यात सहभाग घेतल्यास गावांचा चेहरामोहरा बदलून शाश्वत विकास साध्य होईल. हे अभियान खऱ्या अर्थाने लोकचळवळीचे दूरदृष्टीपूर्ण पाऊल ठरेल.

 (किरण वाघविभागीय संपर्क अधिकारी)


 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰