yuva MAharashtra स्व. आनंदराव (भाऊ) मोहिते यांचे गांधीवादी विचार जिपुढेवंत ठेऊन ते पुढे नेले पाहिजेत ....खासदार विशाल पाटील ; प्रथम पुण्यस्मरण दिनी अभिवादन करण्यासाठी भिलवडी येथील निवासस्थानी अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती...

स्व. आनंदराव (भाऊ) मोहिते यांचे गांधीवादी विचार जिपुढेवंत ठेऊन ते पुढे नेले पाहिजेत ....खासदार विशाल पाटील ; प्रथम पुण्यस्मरण दिनी अभिवादन करण्यासाठी भिलवडी येथील निवासस्थानी अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती...



भिलवडी दि. ११ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस स्व. आनंदराव भाऊ मोहिते यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन रविवारी धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाला. 

सकाळी कीर्तनकार उच्चविद्याविभूषित ह.भ.प. ज्ञानेश्वर माने महाराज हेरवाडकर यांचे कीर्तन झाले. त्यातून त्यांनी स्व. आनंदराव भाऊंचे राजकीय, सामाजिक महत्त्व सांगितले. 

 स्व. आनंदराव भाऊ मोहिते यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक यांसह राज्यभरातील मान्यवर तसेच भिलवडी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. 

माजी आमदार मोहनराव कदम, आमदार डॉ.विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, आ. सत्यजित देशमुख, आ. अरूण लाड, माजी आमदार शिवाजीराव नाईक, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, पलूस तालुका काँग्रेसचे नेते महेंद्र लाड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, युवा नेते जितेश कदम, राहुल महाडिक, गौरव नायकवडी, अशोकराव गायकवाड, बाळासाहेब गुरव, जयदीप भोसले, माणिकराव भोसले, जे.के.जाधव, बाळासाहेब पवार, वैभव पुदाले, धनपाल खोत, निलेश येसुगडे, शरद कदम, दिपक भोसले यांच्यासह भिलवडीचे प्रमुख नेते राजूदादा पाटील, प्रतिक संग्राम पाटील, सरपंच शबाना मुल्ला, उपसरपंच मनोज चौगुले, युवा नेते पृथ्वीराज पाटील, सुरेंद्र वाळवेकर, पै.आनंदराव रास्कर, बाळासाहेब पाटील, माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, मयुर पाटील, उदय पाटील, विजयकुमार चोपडे, बाळासाहेब चोपडे, चंद्रकांत पाटील, सतीश पाटील, प्रल्हाद गडदे, बाळासाहेब आदी मान्यवरांसह हजारो ग्रामस्थांनी स्व. आनंदराव भाऊ मोहिते यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.





आ. डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, 

स्व. आनंदराव भाऊ आणि पतंगराव कदम साहेब यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते. भाऊ नेहमी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विचारधारेप्रती निष्ठावंत राहिले. संघटन कौशल्य, दांडगा जनसंपर्क व सामाजिक बांधिलकी या गुणांमुळे त्यांनी पक्षाच्या संघटनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोचवला पाहिजे. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे आणि सर्वसमावेशक विकास साधणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.


खासदार विशाल पाटील म्हणाले,

स्व. आनंदराव भाऊ मोहिते एक खंबीर व्यक्ती होती.

काँग्रेस पक्षाशी ते कायम प्रामाणिक राहिले. एस. टी. ने प्रवास करताना ते सोबत कुणालातरी घेऊन जायचे. त्यांचे गांधीवादी विचार पुढे नेले पाहिजेत. त्यांचे विचार जिवंत ठेवले पाहिजेत. 

आमदार अरुण लाड म्हणाले, 

स्व.आनंदराव भाऊंनी पक्षाची, समाजाची निस्वार्थ ६० वर्षे सेवा केली. जी. डी. बापूंना ते नेहमी भेटायला यायचे. त्यांचे सर्वांशी आपुलकीचे संबंध होते. भाऊंचे गुण आपण पुढे नेले पाहिजेत.



यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर माने महाराज यांचा सत्कार आ.डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते करण्यात आला.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰