yuva MAharashtra नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा



 

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : कृष्णा-कोयना-वारणा नद्यांच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने आज  दि. 19 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता  कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी 23 फूट 10 इंच इतकी आहे. सद्यस्थितीत धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असून धरणांतून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी उद्या दि. 20 ऑगस्ट 2025 रोजी दुपार नंतर अंदाजे 39 फूट ते 40 फूट पर्यंत होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 

आज  धरणातून  सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे.  कोयना – 89100, धोम – 10373, कन्हेर – 7629, उरमोडी – 4368, तारळी – 3377, वारणा – 36362.

 

            नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्रमांक 0233-2301820, 2302925  वर संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰