yuva MAharashtra गणेशमूर्ती घरीच विसर्जित केल्यास सुंदर पुस्तक भेट..

गणेशमूर्ती घरीच विसर्जित केल्यास सुंदर पुस्तक भेट..

 


भिलवडी दि. २६ : गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करण्यासाठी गेल्या चार वर्षापासून सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील साने गुरुजी संस्कार केंद्राच्यावतीने एक आगळीवेगळी मोहीम राबविण्यात येत आहे. घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी कृत्रिम हौदात केल्यास भाविकांना सुंदर धार्मिक व ज्ञानवर्धक पुस्तक भेट देण्यात येणार आहे.


या उपक्रमामुळे नद्या, तलाव व विहिरींमध्ये होणारे प्रदूषण रोखले जाणार असून पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवरही पाण्याची बचत साधली जाणार आहे. आतापर्यंत नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या मोहिमेत सहभाग नोंदविला असून, पर्यावरण संवर्धनाबरोबरच धार्मिकतेचा सन्मान राखण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.


 

गणेश भक्तांना आवाहन--


 संस्कार केंद्राचे वतीने केंद्रप्रमुख तथा ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांनी गणेश भक्तांना करण्यात आलेल्या आवाहनात म्हटले आहे की, 

या उपक्रमांत जास्तीत जास्त गणेश भक्तांनी सहभागी होऊन..

 “पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून घरगुती विसर्जन पद्धतीचा अवलंब करावा आणि या निमित्ताने ज्ञानवर्धक पुस्तकाचे वाचन करून स्वतःला व समाजाला जागरूक बनवावे.” तसेच

गेले २२ वर्षापासून सुरू असलेले कृष्णा घाटावरील निर्माल्य संकलन याही वर्षी केले जाणार आहे. भिलवडी आणि परिसरातील सर्व गणेशभक्तांनी निर्माल्य कृष्णा नदीत विसर्जित न करता ते कृत्रिम हौदात म्हणजेच निर्माल्य संकलन ट्रॉलीमध्ये विसर्जन करावे.


 नांव नोंदणी --


यासाठी साने गुरुजी संस्कार केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष कवडे मो. नं. 9665 221 822 व सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे 9021 6113 317 या नंबर वरती कॉल करून नावे नोंदवावीत असे आवाहन केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी केलेले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰