yuva MAharashtra सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन



         सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तळमजला, विजयनगर, सांगली येथे शुक्रवार, दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत प्लेसमेंट ड्राईव्ह (भरती मेळाव्याचे) आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 

            या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये  85 पेक्षा अधिक पदांकरिता जिल्ह्यातील सह्याद्री मोटर्स, प्रा.लि.सांगली, मास इंजिनिअर्स, सांगली, कलापी इंजि.असो.प्रा.‍लि.सांगली, घाटगे पाटील ॲटो ॲन्ड फर्म मेकॅनायझेशन, सांगली इत्यादी नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट या प्रकारची शैक्षणिक पात्रता असणाऱ्या आणि जिल्ह्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी विविध पदांकरिता, प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये उपस्थित उद्योजकांकडे प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. उमेदवारांनी मुलाखतीस येताना सर्व मूळ कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटाच्या किमान तीन छायांकित प्रती सोबत घेऊन याव्यात. अधिक माहितीसाठी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली, दुरध्वनी क्रमांक - 02332990383 या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰