yuva MAharashtra न्यायालयीन बदली कामगारांना रिक्त जागेवर तात्काळ कायम करा...मगच सरळसेवा भरती प्रक्रिया राबवा....अन्यथा न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल...संजय कांबळे

न्यायालयीन बदली कामगारांना रिक्त जागेवर तात्काळ कायम करा...मगच सरळसेवा भरती प्रक्रिया राबवा....अन्यथा न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल...संजय कांबळे



VIDEO



> वचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांचा इशारा .

> डॉ‌. प्रकाश गुरव, अधिष्ठाता, सांगली व मिरज सिव्हिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज यांना लेखी निवेदन  


सांगली दि. २४ : पहिल्यांदा मा.न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रिक्त जागेवर बदली कामगारांना कायम करा कारण वर्षानुवर्ष घोंगडे भिजत घातले आहे त्याचा सर्वप्रथम निपटारा करवा. त्यानंतरच शिल्लक जागेवर सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू करावी या मागणीचे लेखी निवेदन पत्र आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हाच्या  शिष्टमंडळाने मिरज सिव्हिल सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांना निवेदन दिले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने वरचेवर लोकशाही मार्गाने आंदोलन,निदर्शने करून तसेच आपणास प्रत्यक्षात भेटून लेखी निवेदनाद्वारे सिव्हिल हॉस्पिटल मधील बदली कामगारांना कायम करण्यासाठी कळविले होते तसेच आजही लेखी तक्रार वजा निवेदनाद्वारे करण्यात आहे की मा. जिल्हाधिकारी, सांगली यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आपल्या आदेशान्वये दिनांक २०/०८/२०२५ नुसार सांगली जिल्ह्यातील दैनिकातून प्रसार माध्यमातून सांगली व मिरज सिव्हिल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य शिक्षण सेवा पथक, तासगाव येथील विविध आस्थापनांमध्ये कास्ट - ४ या संवर्गातील सरळसेवेतील रिक्त विविध प्रकारचे पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे न्यायालयीन बदली कामगारांच्यावर अन्याय होत आहे. गेले २५ ते ३० वर्ष प्रामाणिकपणे येईल त्या कामाला व प्रसंगाला सामोरे जावून आपले कर्तव्य पार पाडले आहे. परंतु त्यांच्या पदरी नेहमी घोर निराशाच पडली आहे.



       मा. मॅट कोर्ट मुंबई तसेच मा. लेबर कोर्ट सांगली यांनी बदली कामगारांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना सांगितले की सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये जशा रिक्त जागा राहतील तसे या बदली कामगारांना कायम करावे असे मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्पष्ट होत आहे. असे असताना आपण सद्या सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू केली आहे त्या नुसार आपण "रिक्त" जागा आहे हे सिद्ध केले आहे. तरी आपण कळकळीची विनंती आहे की, सर्वप्रथम आपण जे गेले २५ ते ३० वर्षांपासून केवळ पशु प्रमाणे राबणारे न्यायालयीन बदली कामगार आहेत. त्यांची आजतागायत पिळवणूक, फसवणूक केली आहे. आणि आताही होताना दिसत आहे. हीन दर्जाची वागणूक दिली जातेय आशा सर्व श्रमिक, कष्टकरी बदली कामगारांना आपण, मा. न्यायालयाच्या आदेशानुसार कायम करावे. सिव्हिल हॉस्पिटल मधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना वर्षानुवर्ष ताटकळत ठेवले आहे याचा प्रथम निपटारा करवा. रिक्त जागेवर विनाविलंब पहिल्यांदा न्यायालयीन बदली कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे त्यानंतर उर्वरित जागेवर  सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली जावी. तसे न झाल्यास आपण जाणीवपूर्वक मा. मॅट कोर्ट मुंबई तसेच मा. लेबर कोर्ट सांगली यांचा अवमान करत असल्याचे सिद्ध होईल. त्यामुळे आम्हाला आपल्या मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या कारभाराच्या विरोधात कायदेशीर दावा दाखल करावा लागेल याची नोंद व दखल घ्यावी. यावेळी होणाऱ्या नुकसानीला  अधिष्ठाता या नात्याने आपण स्वतः तसेच सिव्हिल हॉस्पिटल प्रशासकीय अधिकारी, अधिक्षक आणि शासन जबाबदार राहील असा सज्जड इशारा देण्यात आला.



 यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे, जिल्हा सदस्य रूपेश तामगावकर, विशाल कांबळे, किशोर आढाव यांच्या बरोबरच न्यायालयीन बदली कामगार दशरथ गायकवाड, महोन गवळी, प्रकाश गायकवाड, शोभा पोतदार, सुमन कामत, धर्मेंद्र कांबळे, अनवर कुरणे, शशिकांत जाधव, मुरलीधर कांबळे, मनोज कांबळे, रशीम सय्यद, रमेश साळुंखे, सुनील आवळे, राजु कांबळे, संजय कांबळे, भारत खाडे, शरद कांबळे, राजेंद्र आठवले, महोन आवळे, किरण वायदंडे, बापू वाघमारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰