yuva MAharashtra जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते विमा योजनेतून 4 लाखांचा धनादेश प्रदान

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते विमा योजनेतून 4 लाखांचा धनादेश प्रदान



 सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : मिरज येथील विवेक विद्याधर लकडे, वय वर्षे 24 यांचा सांगली आष्टा मार्गावर तुंग फाटा येथे दिनांक 17 मे 2025 रोजी अपघाताने मृत्यू झाला होता. वारस म्हणून नोंद असलेल्या त्यांच्या मातोश्री वंदना लकडे यांना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजनेचे (PMSBY) 2 लाख रूपये व प्रधानमंत्री जीवन ज्योती वीमा योजनेचे (PMJJBY) 2 लाख रूपये असा एकूण 4 लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द केला.

 

यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, बँक ऑफ इंडिया मिरज शाखेचे अधिकारी राहुल कोमटवार, सचिन पाटील आदि उपस्थित होते.

 

मिरज येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत  विवेक लकडे यांनी प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती वीमा योजनेमध्ये सहभाग नोंदवला होता.  नियमितपणे त्यांच्या बँक खात्यातून या योजनेचा हप्ता जात होता. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने या दोन्ही योजनांचे प्रत्येकी 2 लाख रूपये प्रमाणे एकूण 4 लाख रूपयांचा धनादेश त्यांच्या मातोश्री वंदना लकडे यांना हा आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सुपूर्द केला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी वंदना लकडे यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.



 

प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना – ही योजना फक्त अपघातामुळे होणाऱ्या मृत्यू किंवा अपंगत्वासाठी लागू आहे. या योजनेमध्ये अपघाती मृत्यू किंवा पूर्ण अपंगत्वासाठी 2 लाख रूपयांची विमा सरंक्षण रक्कम आणि अंशत: अपंगत्वासाठी 1 लाख रूपये विमा रक्कम आहे. या योजनेसाठी वार्षिक प्रीमियम केवळ 20 रूपये आहे. 18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्ती पात्र आहेत. प्रीमियमची रक्कम दरवर्षी खात्यातून आपोआप वजा केली जाते. विमा कालावधी 1 जून ते 31 मे पर्यंत दरवर्षी नूतनीकरण करावे लागते.

 

प्रधानमंत्री जीवन ज्योती वीमा योजना – ही योजना नैसर्गिक व अपघाती अशा दोन्ही प्रकारच्या मृत्यूसाठी लागू आहे. या योजनेमध्ये नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यूसाठी 2 लाख रूपयांची विमा संरक्षण रक्कम आहे. या योजनेसाठी वार्षिक प्रीमियम केवळ 436 रूपये आहे. 18 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्ती पा आहेत (प्रीमीयम भरल्यास विमा संरक्षण 55 वर्षापर्यंत चालू राहतो).

 

प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजनेचा वार्षिक प्रीमियम केवळ 20 रूपये व प्रधानमंत्री जीवन ज्योती वीमा योजनेचा वार्षिक प्रीमियम केवळ 436 रूपये आहे.  या योजनेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी केले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰