yuva MAharashtra सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये "जी एन एम नर्सिंग प्रवेश प्रक्रिया" तात्काळ सुरू करा. ....संजय कांबळे , यांची मागणी.

सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये "जी एन एम नर्सिंग प्रवेश प्रक्रिया" तात्काळ सुरू करा. ....संजय कांबळे , यांची मागणी.

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांना निवेदन.



सांगली दि. १९ : शैक्षणिक वर्ष २०२५ - २०२६ शासकीय जी. एन. एम. नर्सिंग कॉलेज प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थी/विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व मानसिक तणाव निर्माण झाला आहे. तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून विनाविलंब 'जी एन एम ' शासकीय  कॉलेज प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करा या मागणीचे निवेदन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्यावतीने निवेदन, अधिष्ठाता  डॉ. प्रकाश गुरव, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय शासकीय वैद्यकीय  रुग्णालय, यांना देण्यात आले. सदरच्या निवेदनाद्वारे कळवले की,




        श्रमिक कष्टकरी गोरगरीब कामगार यांच्या पाल्यांना चांगल्या दर्जाचे मोफत नर्सिंग शिक्षण मिळावे. सद्या शिक्षणाचे बाजारीकरण झाले असल्याने खाजगी कॉलेजच्या मोठमोठ्या शैक्षणिक आकारली जाणारी मोठ्या रक्कमेची फी ही न पेलणारी आहे. शासकीय नर्सिंग कॉलेज प्रवेश घेवून शिक्षण पूर्ण करायचे आहे. परंतु संपूर्ण राज्यातील नर्सिंग कॉलेज सुरू होवून जवळपास पंधरा ते वीस दिवस झाले आहेत तरी सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. केवळ "बीएससी नर्सिंग"  शिक्षणाची नव्याने मिरज शासकीय रुग्णालयात सुरुवात केली असल्याने पुर्वीपासून सुरू असलेले सांगली सिव्हिल हॉस्पिटल मधील "जी एन एम" नर्सिंग कॉलेज बंद करण्याचे कट कारस्थान सुरू असल्याचे दिसून येत आहे. बीएससी नर्सिंग कॉलेज बरोबर "जी एन एम" नर्सिंग कॉलेज ही कायमस्वरूपी सुरू ठेवले जाणे आवश्यक आहे. सद्या शासकीय शाळा तसेच कॉलेज बंद करून खासगी शैक्षणिक संस्थांना पोसण्याचे उद्योग बंद करावे. शासनाच्या वेळ काढून धोरणामुळे श्रमिक कष्टकरी कामगारांच्या पाल्यांना शासकीय नर्सिंग कॉलेज प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सांगली सिव्हिल हॉस्पिटल मधील शासकीय नर्सिंग कॉलेज प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करता येत नाहीत. सदर २०२५ - २०२६ या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय नर्सिंग कॉलेज प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थी/विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व मानसिक तणाव निर्माण झाला आहे. तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून विनाविलंब 'जी. एन. एम. ' शासकीय कॉलेज प्रवेश प्रक्रिया सुरू करावी अन्यथा, गोरगरीब श्रमिक कष्टकरी कामगारांच्या मुलांसाठी हक्काचे मोफत नर्सिंग शिक्षण मिळावे यासाठी खालील प्रमाणे कळवित आहे.



१. सदर २०२५ - २०२६ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी.


२. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी स्पष्ट वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात यावे.


३. मिरज सिव्हिल हॉस्पिटल मध्ये बीएससी नर्सिंग कॉलेज नव्याने सुरुवात केली असल्याने कोणत्याही असंविधानीक कारणांमुळे 'जी एन एम' नर्सिंग कॉलेज बंद अथवा ऍडमिशन प्रक्रियेला विलंब होता कामा नये.


४. सांगली सिव्हिल हॉस्पिटल मधील 'जी एन एम' नर्सिंग कॉलेज मध्ये जास्तीत जास्त श्रमिक कष्टकरी कामगारांच्या मुलांना ऍडमिशन मिळावे याकरिता असणारा मर्यादित विद्यार्थी संख्या "५० विद्यार्थी'' संख्या कोटा वाढवून देण्यात यावा. 


५. प्रक्रिया उशिरा झाल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती तातडीची पावले उचलावीत. आपली सकारात्मक व तातडीची कार्यवाही अपेक्षित आहे. अन्यथा, गोरगरीब श्रमिक कष्टकरी कामगारांच्या मुलांसाठी हक्काचे मोफत नर्सिंग शिक्षण मिळावे यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन व शासन जबाबदार राहील याची नोंद व दखल घ्यावी. यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे (सर), कोषाध्यक्ष हिरामण भगत, सांमिकु क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन, मिरज शहर अध्यक्ष इसाक सुतार, नितीन गांधी, दऱ्याप्पा कांबळे, दिपक कांबळे इत्यादी आवर्जून उपस्थित होते.



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰