yuva MAharashtra स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण



 

        सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार, दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.05 वाजता साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. 

            दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8.35 ते 9.35 या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.35 च्या पूर्वी किंवा 9.35 वाजल्यानंतर आयोजित करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

            जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे होणाऱ्या ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभास स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आईवडील, शौर्य पुरस्कार विजेते, स्थानिक राजकीय पक्षाचे प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी व मान्यवर नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰