yuva MAharashtra भिलवडीत आज रंगणार होड्यांच्या शर्यतीचा थरार...

भिलवडीत आज रंगणार होड्यांच्या शर्यतीचा थरार...

    


    भिलवडी दि. १२ :  संग्राम दादा प्रेरणा प्रतिष्ठान भिलवडी ता. पलूस यांच्या वतीने आज मंगळवार दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी ०४:०० वाजता भिलवडी येथील ऐतिहासिक कृष्णा घाटावर भव्य होड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रमुख संयोजक प्रतीक संग्राम पाटील यांनी दिली आहे.

प्रथम क्रमांकासाठी १५, ०००/-  द्वितीय क्रमांकासाठी १०, ०००/-  तिसऱ्या क्रमांकासाठी ७, ०००/-  आणि चौथ्या क्रमांकासाठी ५, ०००/-  रुपये अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत. 

  विजेत्यां संघाना भव्य आणि आकर्षक चषक दिले जाणार असून  प्रत्येक सहभागी संघांना मानधन, स्मृतीचिन्ह आणि चांदीची भेटवस्तू सुद्धा दिली जाणार आहे.

 

संग्राम दादा प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात येत असून कृष्णाघाटावर महिलांसाठी बैठकीची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.

 या होड्यांच्या स्पर्धेसाठी माजी मंत्री आ.डॉ. विश्वजीत कदम, खा.विशाल पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ठीक ४:०० वाजता या स्पर्धा सुरू होणार असून भिलवडी आणि परिसरातील सर्व ग्रामस्थ आणि बंधू-भगिनींनी ही स्पर्धा पाहण्यासाठी कृष्णा घाटावर उपस्थित राहावे असे आवाहन संग्राम दादा प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰