yuva MAharashtra किर्लोस्करवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांचे 50 व्या दिवशी देखील आंदोलन सुरूच ; उड्डाणपूल व भुयारी पूलाची उभारणी धोकादायक..

किर्लोस्करवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांचे 50 व्या दिवशी देखील आंदोलन सुरूच ; उड्डाणपूल व भुयारी पूलाची उभारणी धोकादायक..


                             VIDEO


किर्लोस्करवाडी दि २१ : सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन 50व्या दिवशी देखील सुरूच आहे.

  खासदार विशाल पाटील आमदार अरुण लाड यांनी आंदोलनाला भेटी दिल्या लवकरच रेल्वे अधिकाऱ्यांशी भेट घेऊन मिटींगचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले होते परंतु महिना झाला अद्यापी मीटिंग चेच नियोजन झाले नाही. किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये उड्डाण पूल, भुयारी पुलाची कामे चुकीच्या पद्धतीने सुरू आहेत या मधून वाहतूक सुरू झाल्यास अनेक अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडणार आहेत. डिझाईन चुकीचे आहे. 

   महारेल ने केलेल्या कामाची चौकशी करावी,दोषी वर कारवाई करावी. झालेल्या खर्चाची भरपाई संबंधितांकडून   घ्यावे यासह इतर 22 मागण्याकरिता हे आंदोलन सुरू आहे परंतु राज्य सरकार, केंद्र सरकार,रेल्वे मंत्रालय,जनरल मॅनेजर,मंडल रेल प्रबंधक लोकप्रतिनिधी यांनी या मागणीकडे गांभीर्याने पाहिले नाही याची खंत अख्तर पिरजादे यांनी बोलताना व्यक्त केली. 

 या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा लढा अधिक तीव्र करू असे ते म्हणाले.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰