व्हिडीओ
सकाळी 9:00 वाजता राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, संदीप वाघमारे, मन्सूर मुजावर यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांनी दहा वाजता लाक्षणिक उपोषणास सुरवात केली. यावेळी, ज्येष्ठ नेते जे के बापू जाधव, मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर भैय्या जाधव, इंद्रप्रस्थ संस्थेचे चेअरमन संग्राम दादा पाटील, व्हाईस चेअरमन अधिक चव्हाण,रामानंदनगर चे माजी सरपंच जयसिंगराव नावडकर, युवक काँग्रेस चे जिल्हाअध्यक्ष डॉ सुशील गोतपागर, दुधोंडीचे माजी सरपंच विजय आरबूने ताजबी शिकलगार, मन्सूर मुजावर, पलूस चे व्यापारी धनाजीराव शेंडगे, जीवन काळोखे,राष्ट्रवादी चे दीपक मदने, बाबासाहेब आंबेडकर विचार मंच चे संदीप वाघमारे आणि विनायक कांबळे, बुर्ली चे उपसरपंच उमेश पाटील, मध्य रेल्वेचे माजी सल्लागार श्रीकृष्ण औटे, बुर्ली चे पोलीस पाटील सचिन सुतार, रामानंदनगर चे पोलीस पाटील इम्तियाज मुल्ला, डॉ. दीपक चौगुले,बबन माने, विष्णू सुतार, एस वाय पाटील,कुमार कांबळे, अमर शिसाळ, राजाराम कटारे, मानवाधिकार संघटनेच्या अश्विनी मिठारी, मुबीन पठाण, दिलीप रकटे, रमेश लोखंडे, उदय सुतार, शकील पठाण, बापुसो मिठारी, संजय जाधव,निशिकांत रकटे, अशपाक शिकलगार, शहिदा पिरजादे,भाजपा चे विजय लोंढे, महादेव देसाई,अमित साळुंखे,अनिल जाधव,शीतल सावळवाडे, अस्लम संदे, जमीरखान पठाण यांच्या सह शेकडो प्रवाशांनी भेटून आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी अख्तर पिरजादे म्हणाले की माझ्या मागण्याकरिता हा लढा मी सुरु ठेवणार आहे. जर का रेल्वे प्रशासन आणि केंद्र शासनाने माझ्या मागण्यांचा विचार करून सोडवणूक केली नाही तर मी माझे आंदोलन अधिक तीव्र करणार आहे वेळ प्रसंगी खासदार विशाल दादा पाटील यांच्या निवास स्थानासमोर आंदोलन करू जेणेकरून याचा विचार केंद्र शासनाला घ्यावा लागेल.
जिल्हाधिकारी अशोक काकडे, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार दीप्ती रिठे, निवासी नायब तहसीलदार डॉ आस्मा मुजावर, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच मिरज रेल्वे लोहमार्ग पोलीस चे पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण आणि त्यांचे सहकारी आणि पलूस पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील,पोलीस माळी दादा यांचे ही सहकार्य लाभल्याचे पिरजादे यांनी सांगितले.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त होता.
यावेळी जे के बापू जाधव म्हणाले की अख्तर पिरजादे यांच्या मागण्या रास्त आहेत त्या सोडवल्या पाहिजेत, जयसिंग नावडकर म्हणाले,अख्तर पिरजादे यांच्या आंदोलनात आम्ही सर्व रामानंद नगर वासिय आहेत भविष्यात हे आंदोलन तीव्र करू.
संध्याकाळी पावणे सात वाजता माजी सरपंच जयसिंग नावडकर आणि ताजबी शिकलगार यांच्या हस्ते अख्तर पिरजादे यांनी लिंबू सरबत घेऊन लाक्षणिक उपोषण सोडले.
हेही पहा --
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰