१) डिप्रेशन म्हणजे वेड नव्हे. याबद्दल संकोच, कमीपणा बाळगू नये. आपल्याला डिप्रेशन (नैराश्य) आले आहे, हे स्वतः मान्य करणे महत्वाचे आहे. त्यानंतरच उपायांचा विचार करता येईल.
२) डिप्रेशनमध्ये कुटुंबाचा व मित्रमंडळींचा मानसिक आधार खूप मोलाचा आहे. त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे.
३) डिप्रेशन पासून दूर राहण्यासाठी स्वत:ला सतत गुंतवून घ्यावे. स्वतःला आवडणारे काम करावीत. काहीच करायला नको वाटत असेल तरीही काहीतरी करावे.
४) सकारात्मक विचार करावा. नकारात्मक विचारांपासून जाणीवपूर्वक दूर रहावे. चॅनेल वरील नकारात्मक बातम्या पाहू नयेत.
५) आहारात बदाम, जवस, ग्रीन-टी, नारळ, टमाटर, पालक यांचा समावेश करावा. अश्वगंधा पाक दुधासोबत घ्यावा. दूधामध्ये दोन चमचे मध मिसळून दिवसातून दोन वेळा घ्यावे.
६) डी-विटामिनयुक्त पदार्थ खावेत. याचा सॅशे मिळतो, त्याचा वापर आठवड्यातून एकदा, असा चार आठवडे करावा. ब्राह्मी, हिंग, शंखपुष्पी यांचे समसमान चूर्ण करून रोज घ्यावे.
७) चमेलीची फुले नैराश्य कमी करतात. या फुलांचा गंध मेंदू मधील उष्णता कमी करतो. हा प्रयोग करून पहावा.
८) रोज किमान अर्धा तास मेडीटेशन करावे. यामुळे मन शांत होते, अस्वस्थता कमी होते. ओंकार, प्राणायाम करावा. यामुळे डिप्रेशनची लक्षणे कमी होतात.
९) रोज पंधरा ते वीस मिनिटे ज्ञान मुद्रा करावी. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून, अंगठा आणि तर्जनीची टोके एकमेकाला लावावी, इतर तीन बोटे सरळ ठेवावी. या मुद्रेमुळे मन शांत होते, डिप्रेशन कमी होण्यास मदत होते.
१०) मोकळ्या हवेत फिरायला जावे. प्रकृती व वयानुसार हलका व्यायाम करावा. दीर्घश्वसन करावे. एरोबिक्स करावे. याचा रक्ताभिसरण प्रक्रियेवर चांगला परिणाम होतो. छातीवर येणारे दडपण, धडधड कमी होते. एनडोर्फीन सारखी मन आनंदी ठेवणारी केमिकल शरीरात स्त्रवतात.
११) लांब फिरायला, ट्रीपला जावे, विनोदी सिनेमे पहावेत. गाणी, संगीत ऐकावे. लहान मुलांशी खेळावे. घरी पाळीव प्राणी असेल तर त्यांच्याशी खेळावे. एकटे बसावे असे वाटले तरी एकटे बसू नये. मित्रांबरोबर वेळ घालवावा.
१२) निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या छंदात वेळ घालवावा जसे कि, आकाशातील रंग पहावे. बागेत काम करावे, जे आवडेल ते करावे. विशेषतः पूर्वी आवडत असणाऱ्या गोष्टी अगदी ठरवून कराव्यात. यामुळे ते मजेदार दिवस पुन्हा येऊ शकतात.
१३) समुपदेशक, कौन्सिलर यांचा सल्ला घ्यावा. त्याप्रमाणे वागण्यात बदल करावा.
संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰