सांगली दि. ३० : वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने, मा. जिल्हाधिकारी साॊ, सांगली यांना लेखी निवेदनाद्वारे कळले आहे की, मिरज आणि सांगली सिव्हिल हॉस्पिटल मधील मा.न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बदली कर्मचारी यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून कायम करावे यासाठी सदर कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय आरोग्य वरिष्ठ अधिकारी, शासन स्तरावर व संबंधित हॉस्पिटलचे अधिष्ठाता यांना निवेदन देऊन वेगवेगळ्या मार्गाने पाठपुरावा केला असता सदर सर्व अन्याय पिडित कामगारांना न्याय मिळाला नाही. उलट न्यायालयाचे कायम करण्यात यावे असे आदेश असतानाही दुर्लक्षच केले आहे.
सदर शासकीय हॉस्पिटलमध्ये वीस ते पंचवीस वर्षे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे याचे गोडबंगाल काय? कारण वीस ते पंचवीस वर्षे सेवा देऊनही नोकरी लागल्यापासून अथवा मा. न्यायालयाचा निकाल लागल्यापासून आजतागायत बदली कामगारांचा ई.पी.एफ हा संस्थेकडून ई.पी.एफ कार्यालय यांना भरणेत आलेला नाही. त्यामुळे बदली कामगार हे तेव्हापासून ते आजतागायतपर्यत ई.पी.एफ लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे सदरचा ई.पी.एफ हा संबंधित अधिष्ठाता यांचेकडून वसूल होऊन बदली कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात यावा. सदर कर्मचाऱ्यांचा ई. पी.एफ. व ई. एस. आय.सी. जमा होत नाही या कर्मचाऱ्यांना कंत्राटी कामगार म्हणून सांगितले जाते असे असेल तर गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या कर्मचाऱ्यांचा ठेकेदार कोण? ठेकेदाराकडे प्रत्येक बदली कामगारांचा वेतन किती जमा होतो याचा खुलासा करून आजपर्यंतचे कर्मचाऱ्यांचे वेतन याची खुलासा करून, ठेकेदारांनी फसवणूक आणि पिळवणूक केली असल्याने सदर ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. शासनाने या बदली कामगारांचा ई.पी.एफ. व इ एस आय सी , आजतागायत केंद्रीय भविष्य निधी कार्यालयास भरलेला नाही व अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेला असतानाही आज तागायत त्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घेतले नाही ही खेदाची बाब म्हणावी लागेल.
तसेच कोरोना महामारीच्या काळात सदर कर्मचाऱ्यांनी मानसिक ताण-तणाव,चिंता,जिकडे तिकडे भीतीचे प्रमाण वाढले असताना देखील या आव्हानांना तोंड देऊन आपला जीव धोक्यात घालून सदर कर्मचारी एकत्रितपणे काम करून प्रामाणिक सेवा दिली. यामधील अनेक चतुर्थ श्रेणीतील बदली कामगार हे मयत झालेले आहेत तर काहीजणांनी आपल्या वयाची मर्यादा ६० वर्षे पूर्ण केली आहे. त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले जवळपास पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत सेवा बजावली आहे. अशा सर्व चतुर्थ श्रेणीतील बदली कामगारांच्या कायदेशीर वारसांची कागदपत्रांची पूर्तता करून शासनाकडे तसा प्रस्ताव सादर करून त्यांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेतले जाणे आवश्यक आहे. असे असताना देखील शासन स्तरावर या अन्याय पीडित कामगारांना शासन सेवेत समाविष्ट करून न्याय देण्याबाबत निर्णय झालेला नाही. म्हणून सदर कामगारांना आणि त्यांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे.न्यायालयीन बदली चतुर्थ कामगार अथवा त्यांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेतल्याखेरीज नव्याने सरळ सेवा शासकीय कामगार भरती प्रक्रिया सुरू करण्यात येवून नये. त्यांच्या कुटुंबीयांना योग्य न्याय मिळण्यासाठी व शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आपणांस आम्ही निवेदन / विनंती वजा तक्रार अर्ज देत आहोत.
तरी सदर निवेदनाचे गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ शासन स्तरावर चर्चा करून आठ दिवसात न्याय मिळावा, अन्यथा येणाऱ्या काळात, आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारण्याकरिता निर्माण केलेली एकमेव कामगार संघटना म्हणजेच, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण स्वतः व संबंधित प्रशासन अधिकारी व महाराष्ट्र शासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, जिल्हा सदस्य दऱ्याप्पा कांबळे, कोषाध्यक्ष हिरामण भगत, सांमिकु क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे, संदिप कांबळे, राकेश कांबळे, राजेंद्र आठवले,महोन गवळी, प्रकाश गायकवाड यांच्या सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील न्यायालयान बदली कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही पहा --
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰