सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रवेशित नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रीशिप, छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार व निर्वाह भत्ता या योजनांचे अर्ज दि. 30 जून 2025 पासून https://mahadbt.maharashtra.
सन 2023-24 मधील प्रलंबित असलेले Re-Apply टॅब उपलब्ध करून दिलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रलंबित विद्यार्थ्यांनी या योजनांचे अर्ज दि. 31 जुलै 2025 पर्यंत भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे.
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील नवीन व नूतनीकरण प्रवेशित अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून दि. 30 जून 2025 पासून महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरता येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली कार्यालय, जुना बुधगाव रस्ता, सामाजिक न्याय भवन सांगली येथे संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
हेही पहा --
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰