yuva MAharashtra विदर्भात कोळस्याची खाण, अडाणीचं बसवाय बस्तान...; भजनाच्या माध्यमातून मत कुंनकीत निषेध,... वर्मावर नेमके बोट

विदर्भात कोळस्याची खाण, अडाणीचं बसवाय बस्तान...; भजनाच्या माध्यमातून मत कुंनकीत निषेध,... वर्मावर नेमके बोट



                               VIDEO




तासगाव / प्रतिनिधी, दि. १८ जुलै २०२५

या शक्तिपीठ हायवेने आम्ही झालोय हैराण, या देवेंद्र फडणवीस ने रचलंय आमचं सरण या भजनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध करत मत कुणकी येथील मोजणी तिसऱ्या दिवशीही बंद पाडली. दिवसभर टाळ मृदागच्या गजरात शेतकऱ्यांनी भजन, कीर्तन, म्हणत शासनाचा निषेध करत कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला. 
गेल्या तीन दिवसा पासून मत कुणकी येथे शासकीय कर्मचारी मोजणी साठी येत आहेत. मात्र तिन्ही दिवस शेतकऱ्यांनी मोजणी होऊ दिली नाही. 
शुक्रवारी दिवस भर ज्ञानबा तुकाराम चा गजर करत सप्रदायिक भजने तर गायलीच मात्र अमोल पाटील याने तयार केलेली सामाजिक आणि शक्तिपीठ च्या समस्यावर तयार केलेली भजणे सादर करून जोरदार निषेध व्यक्त केला.
या शक्तिपीठ हायवेने आम्ही झालो रे हैराण, या देवेंद्र फडणवीसने रचलंय आमच सरण,
राज्यकर्ते झाले गुंड, विरोधक झाले षंड, बळीराजा ऊठ आता करुनी बंड, अरे एकजुटीने जिरवू यांचा कंड 
या देवेंद्र फडणवीस ने रचलंय आमचं सरन, विदर्भात कोळस्याची खाण, अडाणीचं बसवायला बस्तान, शक्तिपिटा चा घातलास घाट, शेतकऱ्यांची लावुनिया वाट, महापुराने शेतकरी होणार उध्वस्त, या शक्तिपिटाने होईल निसर्गाचा ऱ्हास या देवेद्रा तुला तलप शक्तिपिटाची, तलप तुला सत्तेच्या नशेची या भजनाला उपस्थित दाद दिली. उपस्थित सरकारी कर्मचाऱ्यांनीही याला टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. यावेळी महेश खराडे, उमेश देशमुख, प्रभाकर तोडकर अरुण  पाटील, अमोल पाटील, उत्तम रणवरे, मनोज पाटील, धनाजी चव्हाण, राहुल नलवडे, सुनील पवार, मोहन गव्हाणकर, नवनाथ मोरे, सुजित नलवडे, विजय माने आदिसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

◾ YouTube Channel

   🌐  https://youtube.com/@thejanshakatinews5707

◾ News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰