सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिनांक 14 जुलै 2025 रोजीच्या आदेशान्वये सांगली जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिध्द केली आहे. ही अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसिलदार व गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या sangli.nic.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर आदेशातील मसुद्यास ज्या लोकांच्या काही हरकती असतील त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे दिनांक 21 जुलै 2025 पर्यंत किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात. या तारखेनंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰