ठाणे : सांगली लोकसभा मतदार संघात २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढविलेले सांगली जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली होती.
गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकिय घडामोडी पाहता चंद्रहार पाटील यांचा शिंदे गटातील प्रवेश सोहळा फक्त एक औपचारिकता म्हणून राहिला होता.
अखेर चंद्रहार पाटील यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह सोमवार दि ०९ जून रोजी नेहरूनगर, ठाणे येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, विटा खानापूर मतदार संघाचे आमदार मा. सुहास बाबर यांच्यासह आदी मान्यवर व हजारो शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रहार पाटील यांच्या हाती शिवसेनेचा झेंडा दिला. त्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.
पक्षाची ध्येय धोरणे पाळून मी पक्षवाढीसाठी प्रामाणिक काम करणार आहे असे चंद्रहार पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
हेही पहा --
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰