yuva MAharashtra मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह चिंचणी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू ; मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, इस्लामपूर येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह चिंचणी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू ; मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, इस्लामपूर येथे प्रवेश प्रक्रिया सुरू




मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह चिंचणी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

      सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या कडेगाव तालुक्यातील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह चिंचणी येथे विनामूल्य ऑनलाईन पोर्टल‌द्वारे प्रवेश सुरू आहेत. प्रवेशासाठी अर्ज  ऑनलाईन  पध्दतीने  https://hmas.mahait.org  या

वेबसाईटवर भरावयाचा आहे, असे वसतिगृहाचे अधिक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

या वसतिगृहामध्ये मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जमाती, अपंग, अनाथ, आर्थिक मागास, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग इत्यादिंना प्रवर्गनिहाय व गुणवत्तेनुसार इयत्ता 8 वी, 11 वी, प्रथम वर्ष बी.ए., बी. एस्सी., बी. कॉम. आणि प्रथम वर्ष व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनीसाठी विनामुल्य ऑनलाईन पोर्टलव्दारे प्रवेश सुरू आहेत. वसतिगृहात मोफत निवास व भोजन व्यवस्था, मोफत शालेय साहित्य (वह्या, पुस्तके, स्टेशनरी इत्यादी), मोफत शालेय गणवेश दोन नग, रेनकोट / छत्री, गमबूट,  मासिक निर्वाह भत्ता 600 रूपये व सहल खर्च 2 हजार रूपये, महाविद्यालय विभाग स्टेशनरीकरिता 4 हजार रूपये,  प्रोजेक्ट 1 हजार रूपये व गणवेशाकरिता 2 हजार रूपये अशा सुविधा असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


 

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, इस्लामपूर येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

 

        सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, इस्लामपूर येथे सन 2025-2026 करिता रिक्त 36 जागेवर विनामूल्य ऑनलाईन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. गरिब होतकरू विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org/ या पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करून अर्जाची प्रत व कागदपत्रे वसतिगृहात जमा करावीत, असे आवाहन वसतिगृहाचे अधिक्षक धनाजी चौगुले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 

या वसतिगृहात राज्यातील अनुसूचित जातीच्या २९ जागा, अनुसूचित जमातीच्या ०१ जागा, वि.जा.भ.ज.च्या ०१ जागा, आर्थिकदृष्ट्या / इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या ०१ जागा, विशेष मागासवर्गीय प्रवर्गाच्या ०२, व अपंगच्या ०२ जागा अशा एकूण रिक्त ३६ जागेवर विनामूल्य ऑनलाईन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

            सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इस्लामपूर-वाळवा तालुका जवळील शाळा व महाविद्यालयात इयत्ता ०८ वी, ०९ वी, १० वी, ११ वी, प्रथम वर्ष डिप्लोमा / आयटीआय, प्रथम वर्ष बी.ए /बी.कॉम / बी.एस्सी / अभियांतत्रिकी पदवी/ इतर पदवी कोर्सेस, प्रथम वर्ष कोणतीही उच्च पदवी व प्रथम वर्ष पदविकाचे नियमित शिक्षण घेत असलेल्या बाहेरगांवाकडील/ परगांवा वरुन ये-जा करणाऱ्या (इस्लामपूर स्थानिक विद्यार्थी सोडून) विद्यार्थ्यासाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन https://hmas.mahait.org/ या पोर्टलद्वारे सुरू असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰